चाकरी


‘चाकरी’ आणि ‘गुलामी’ हे दोन समानार्थी शब्द आहेत. आश्चर्य वाटेल! परंतु सत्य हेच आहे. पूर्वीच्या काळी धनाढ्य लोक त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ‘गुलाम’ खरेदी केले जात. खरेदी केलेला ‘गुलाम’ हा माणूसच असे. परंतु त्याने आपला ‘मालकाची’ सर्व कामे. त्याच्या इच्छेनुसार कराव्या लागे. मालकाची वर्तणूक कशीही असो. त्याने कितीही अत्याचार, अन्याय किंवा अपमान करो. ‘गुलाम’ माणसाला त्या सोसावेच लागे. मालक जे देईल (देईलच अशी शाश्वती नाही) ते खायचे. मालक म्हणेल तीच ‘पूर्व’.

आताच्या काळातही ही प्रथा चालूच आहे. फक्त काळानुरूप बदल घडले आहेत. कितीही कोणी नाकारले तरी! थोडक्यात ‘व्हर्जन २.०’. ‘गुलाम’ ऐवजी आजकाल चाकर, नोकर, एम्प्लॉई वगैरे वगैरे. धनाढ्य लोक आधी स्वतःसाठी आजकाल ‘कंपनी’साठी म्हणून एम्प्लॉई खरेदी केले जातात. मग कंपनी सांगेन ते आणि तस् नव्हे तर तेच करायचे. बाकी सेम. कंपनी म्हणेल तीच ‘पूर्व’.

शब्दात काय वर्णन करू? कुठल्याही ‘गुलामा’लाच गुलामीची व्यथा विचारा ना! अरे, सॉरी सॉरी. कोणत्याही चाकराला त्याच्या कामाविषयी आणि त्यांच्या कंपनी अथवा बॉस विषयी विचार ना, अस मला म्हणायचे होते. पूर्वी गुलामाच्या गळ्यात लोखंडी टोकदार गोलाकृती बंधन असायचे. आजकाल ‘पट्टे’ आणि ‘बॅच’ आहेत.

थोडक्यात तुम्ही अमुक एका मालकाचे गुलाम आहात, ह्याची जाणीव व्हावी इतकेच. बाकी मालकाच्या वागण्या, बोलण्यात काही फरक नाही. त्याचा आनंद तो गुलामाला ‘बदडण्यातच’. तुम्ही कितीही नावे बदललीत. नोकरी म्हणालात. कितीही कंपन्या बदलल्यात तरी मूळ मालकाची, बॉसची वृत्ती सेमच. फरक काय तो उदरभरण करण्याचा. बाकी कंपनीचे काम कितीही करा. कितीही टास्क कितीही कमी वेळात करा.

अगदी दिवसाचे चोवीस तास जरी राबलात तरी. मालकाला काय समाधान नाहीच. शेवटी चाकरी ती गुलामी. स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी कोणत्याही गुलामाने, नोकराने कितीही नाकारले तरी वस्तुस्थिती हीच आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.