जंगलराणीच अभिभाषण


माननीय सदस्य ‘प्राणी’ गण,
या नव्या दशकात दोन्ही गुहेतील पहिल्या सत्राला आपण सगळे उपस्थित आहात. मी तुमचे स्वागत करते (म्याऊ..). मला हा विश्वास आहे की तुम्ही सर्व जण या जंगलाला समृद्धीच्या दिशेने आणि विश्वात एका उच्च जागी नेण्यासाठी समर्पित होऊन काम कराल आणि गौरवपूर्ण दशक बनवाल. पुढे अजून शिकारी करायच्या आहेत म्हणून तुमच लक्ष अपेक्षित आहे.

मी त्या मुंग्यांच्या कुटुंबियासाठी दुखः प्रकट करते ज्यांचे प्रियजन पुण्याच्या दहशदवादी हल्ल्यात गमावलेले आहेत. नक्षली लांडग्यांची हिंसा पश्चिम बंगालच्या जंगलात चालूच आहे. ज्यात अनेक निष्पाप प्राणी मारले गेले आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला त्याविरुद्ध लढण्याला अधिक दृढ करतात. माझे ‘मनीसिंह’ च्या सरकारने त्या नक्षली लांडग्यांना हिंसा सोडून गप्पा मारायचा बोलावलं आहे. प्राण्यांच्या प्रशासनाला सुदृढ करणे आणि सर्वांगीण लाभ देण्याची योजना आमच्या दृढ ध्येय्याने चालू राहतील.

माझ्या ‘मनीसिंह’ सरकारला ‘बहु प्राणीवाद’ आणि ‘प्राणी निरपेक्ष’ मूल्यांना संरक्षित, मजबूत आणि निष्पक्षपणे तीव्र विकास सुनिश्चित करण्याचा प्राण्यादेश मिळाला आहे. मे २००९ जंगलग्रहण पासूनच ‘मनीसिंह’ सरकार तीव्र जंगल विकासाला किती जीव तोडून काम करत आहे हे तुम्ही पाहत आहातच. नाहीतरी आमच्या या आश्वासनांचा केंद्रबिंदू ‘आम प्राणी’ होता. वैश्विक महामंदी नंतर, आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक दुष्प्रभाव आणि २००९ च्या मध्य मध्ये जंगलात आलेल दर वेळेच्या दुष्काळात ‘आम प्राणी’ वाचवण आवश्यक होत.

माझ्या ‘मनीसिंह’ (दोनदा म्याऊ म्याऊ..) सरकारने जंगलातील सध्याच्या आर्थिक आणि प्राणीमाजिक समस्या सोडवण्यासाठी ससाप्रमाणे संवेदनशील आणि आणि घुबडाप्रमाणे सजग असा ‘दृष्टीकोण’ ठेवला आहे. ‘मनीसिंह’ सरकारने भिन्न भिन्न राजकीय आणि मागणीला जंगल व्यवस्था मजबूत करण्याच कार्य बैलाप्रमाणे अगदी निष्ठेने केले आहे. विश्व समुदायासोबत ‘संबंध’ ठेवताना आपल्या जंगल हिताला प्राधान्य दिल आहे. जंगलाच्या सरकारी संस्था आणि प्राण्यांच्या खाजगी उद्योगात परस्पर ‘संबंधात’ संवेदनशीलता आणली आहे.

आपल्या गुहा, घरटे व्यवस्थेला प्रोत्साहन देवून ‘सुदृढ’ रीतीने विश्वव्यापी आर्थिक मंदीचा पद्धतीने सामना केला आहे. त्याचे निकाल चांगले लागले आहेत. (मुंग्यांच्या आत्महत्या यांचा निकालाशी काहीही संबंध नाही) जंगलाचा आर्थिक विकास दर २००८-०९ मध्ये कमी होवून ६.७% झाली होती, ती २००९-१० मध्ये ७.५% होऊ शकते. (आपण अंदाज करायला काय जाते?) ज्यावेळी औद्योगिक जंगलांत विकास नकारात्मक होता त्यावेळी आपल्या जंगलांत विकास (?) प्रभावी वेगाने वाढत होता.

महात्मा ‘गांधीण’ माशी जंगल ग्रामीण रोजगार ग्यारंटी नियमांतर्गत कार्यात वेगवानता आली आहे. राजीव ‘गांधीण माशी’ ग्रामीण विद्युत योजनेच्या मांस स्वरूप ६७ हजार झाडांवर विद्युतीकरण केल गेल आहे.

माननीय सदस्य ‘प्राणी’ गण,
प्रधानप्राणी ची ‘जम्मू कश्मीर’ जंगल पुनर्निर्माण योजना खुपच चांगले कार्य करीत आहे. या अंतर्गत मुंग्यांसाठी रस्ते, हत्तींसाठी कॉलेज, कुत्र्यांसाठी औद्योगिक संस्था आणि जलचर प्राण्यांसाठी ‘पाणीवाडी’ ताबडतोप सुरु केलेले आहेत. अनुसूचीत आणि अन्य परंपरागत वनवासी माकडांना सात लाख ओळखपत्र दिली गेली आहेत.

‘मनीसिंह’ सरकारने अल्पसंख्यांक सापांसाठी एक योजना तयार केली आहे. त्या अंतर्गत ८२ हजार कोटी रुपये वाटले गेले आहेत. आणि जंगल केंद्र सरकारच्या रिक्त ठिकाणी त्यांची नेमणूक केली जात आहे.

माझी ‘मनीसिंह’ सरकार जंगल पंचायतमध्ये ५०% मादी आरक्षण देण्यासाठी ‘जंगल संविधानात’ संशोधन करीत आहे. या गुहा सत्रात त्यावरील दोन विधेयके मंजूर होतील याची आशा बाळगते.(म्याऊ..)

सगळ्या क्षेत्रात विकासासाठी ‘शिक्षा’ मध्ये गुंतवणूक आवश्यक आहे. ‘जंगल माध्यमिक शिक्षा’ द्वारा माध्यमिक शिक्षेचे सार्वजनिकरण करीत आहे. ‘पिल्लांचा निशुल्क आणि अनिवार्य शिक्षण नियम २००९’ या एप्रिल २०१० पासून लागू होईल.

आपल जंगल इतिहासाच्या एका मोठ्या वळणावर उभे आहे. आपल्या जंगल निर्माते त्यावेळी विकासाच्या इतके जवळ नव्हते जेवढे आत्ता आहोत. या अपेक्षांना पंडित भुंगालाल वासरू यांनी १९४७ मध्ये अमावास्येच्या रात्री याच गुहेत या शब्दात वर्णन केले होते

जंगल सेवेचा अर्थ हा आहे की त्या करोडो प्राण्यांची सेवा करणे जे पिडीत आहेत. याचा अर्थ असा आहे की गरीब , अज्ञानी आणि असमान संधी समाप्त करणे.

आम्ही हे ध्येय साध्य करण्यासाठी निर्णायक पंजे उचलले आहेत. अजून बरंच काही करायचं बाकी आहे. शिखर लांब आहे पण आमची यात्रा चालू आहे. तर मग या आणि उज्वल जंगल भवितव्यासाठी पंजेवर पंजा टाकून पुढे चला.

जय जंगल | (म्याऊउ……….. )


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.