जप


ही आई पण ना. वडिलांनी मला एका मंत्राचा जप करायला सांगितला आहे. या डिसेंबरपर्यंत. आता रोज रात्री मी तो करतो. पण आमच्या आईसाहेबांना कितीही केला तरी कमीच वाटतो. आधी रोज जप एक माळ करायचो. म्हणजे १०८ वेळा. तर आईसाहेबांना कमी वाटायचा. आता रोजच्या पाच माळा जप केला तरी आई साहेबांना कमीच. दहा माळा करत जा असा सल्ला दिला. एक तर मी त्या दोघांच्या समाधानासाठी हे सगळ करतो. आणि करतो ते राहिलं बाजूला. ह्याचं आपल कमी कमी होत आहे. माझे आई वडील, दोघांचा देवावर खूप विश्वास. काय बोलणार. आणि माझा त्या दोघांवर विश्वास. म्हणून जप चालला आहे. आता अडीच वर्ष ‘ती’ चा जप करून काही झालं नाही. तर आता ज्या देवाला कधी पहिलच नाही. त्याचा जप करून काय होणार आहे? देव जाणे.

वडीलांच अस म्हणण आहे की, जप केल्याने मानसिक ताकद वाढते. आईच म्हणण अस आहे की जपाने आपल पुण्य वाढत. असो, माझा काही याला विरोध नाही आहे. एखाद्या गोष्टीने दुसरा समाधानी होणार असेल तर करायला काय हरकत आहे? बर ह्यांना अस वाटत की मला लग्नासाठी येणाऱ्या अडचणी त्या जपाने नाहीशा होतील. माझा ना लग्नाला आणि ना जपाला विरोध. पण आई आजकाल इतका अतिरेक करते की काही विचारू नका. रोज दहा माळा करायला काय हरकत आहे अस म्हणते. आता एकतर कंपनीतून आल की फुटबॉल, तिथून आल की जेवण. बर ते झालं की तो जप. आणि दहा माळा करायला तासभर लागतो. आणि ते झालं की थोड्या वेळ संगणकावर बसायचं म्हटलं की झालं रात्रीचे दोन. आणि मग झोपायला तीन. आणि मग माझी पहाट होते सकाळी नऊ वाजता. कंपनीची वेळ आठ वाजता. आज आईला मला लग्नच नाही करायचे अस सांगून टाकल. पण काय फरक पडला नाही. वडिलांना देखील म्हणून बघितलं पण त्यांनी फारच मनावर घेतलं आहे माझ्या लग्नाच. सोडा तो विषय. मी बाकी मजेत आहे. काल थोडा माझा मूड हाप झाला होता. पण आता ठीक आहे. बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.