जय जय महाराष्ट्र माझा!


महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. उशिरा देतोय. त्याबद्दल क्षमस्व. आपला महाराष्ट्र खरच सुंदर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. ज्याने हा महाराष्ट्र अगदी मढला आहे. डोंगर, नद्या आहाहा. क्वचित एखाद्या भूप्रदेशाला असे लावण्य लाभले असेल. इथली लोक देखील तशीच. आणि स्वभावाने अगदी मधुर. कधीकधी याच गोष्टींमुळे महाराष्ट्र बाकीच्या लोकांच्या डोळ्यात खुपतोय असे वाटते. सतत काही न काही चालूच.

कधी भाषेवर कधी जागांवर आक्रमणे. कधी कधी तर तोडण्याचीच भाषा. त्याच अस आहे. प्रत्येकजण आपआपली मते, आपल्याला येणाऱ्या अनुभवावरून बनवत असतो. मध्यंतरी भाजप – शिवसेनेचे ‘टाईमपास’ पाहून जाम विटलो होतो. मराठी भाषेला नाही, पण ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाला फारच विटून गेलेलो. पण गेल्या काही दिवसांत अशा लोकांशी सबंध आलेला, की ज्याने मी एकटाच असा नाही असे वाटू लागले..

आपली भाषा/राज्य यात खूप गोष्टी आहेत. ज्याने आपण असे का आहोत याची उत्तरे मिळते. असो, यावर एखाद्या दुसऱ्या दिवशी चर्चा करूयात. तूर्तास, आपण सगळे एका राज्याचे एका भाषेचे पाईक आहोत. आणि याचा मला अभिमान आणि आनंद आहे. गेल्या काही वर्षात पाण्याचे प्रश्न वारंवार निर्माण होत आहेत. आपण स्वत: यात पुढाकार घेऊन गरजेनुसार त्याचा वापर केलात तर आपण या राज्याला, आपल्या बांधवांना, ज्यांना पाण्याच्या विवंचनेने ग्रासले आहे. त्यांना मदत करू शकतो. ती देखील आपली भावंडे आहेत. असो, फार बोलत नाही. आपण, सुज्ञ आहात. फार बोलून मी आपल्या दोघांचाही वेळ वाया घालावाल्याप्रमाणे होईल. तूर्तास थांबतो. जय हिंद | जय महाराष्ट्र ||


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.