जय हो भोसरीकर


भोसरी नाशिक-पुणे महामार्गावरील एक उपनगर. दुपारची वेळ. एका सराफाच्या दुकान लुटण्याच्या उद्येशाने दोन मोटारसायकलीवर चार चोर आले. चौघांच्या डोक्यावर हेल्मेट होते. त्यातले दोघे दुकानात शिरले. दोघांनी हेल्मेट काढून ठेवले. आणि दुकान मालकावर पिस्तुल रोखून हिंदीत ‘हलू नका’ असा दम भरला. एकाने मालकावर पिस्तुल रोखले तर दुसऱ्याने काउंटरच्या बाजूने जाऊन एका पोत्यात सोन्याचे दागिने भरले. चोर दुकानाच्या बाहेर आले. मालक आणि त्याचा नोकर त्या चोरांच्या मागे धावत आले. नोकराने चोराच्या पाठीत बुक्के मारले. त्याला प्रत्युतर म्हणून मोटारसायकलीवर बसलेल्या एकाने मालकावर पिस्तुलीच्या गोळ्या झाडल्या. मालकाच्या पायात आणि पाठीत अशा दोन गोळ्या लागल्या.

हे बघताच शेजारच्या स्टीलच्या दुकानातील एकाने दुकानातील स्टोव्ह एका चोरावर फेकून मारला. तो चोर रस्त्यावर पडला. तेवढ्यात मालकाने ते सोन्याच्या दागिन्यांचे पोते चोराकडून हिसकावून घेतले. हा सगळा प्रकार बघत असलेले बाजूच्या भोसरीकरांनी त्या चोरांवर दगडफेक केली. भोसरीकरांना पांगवण्यासाठी एका चोराने हवेत गोळीबार देखील केला. पण भोसरीकरांनी दगफेक चालूच ठेवली. दोन चोर पळाले पण बाकीच्या दोघांना भोसरीकरांनी पकडून ठेवले. नंतर यथावकाश आलेल्या पोलिसांना ते सुपूर्त केले. ही घटना मागील आठवड्यात शुक्रवारी म्हणजे बारा मार्चला घडली. आता पोलीस त्या सराफाचा सत्कार करणार आहे अस म्हटले आहे. भोसरीकरांनी केलेला पराक्रम खरंच अतुलनीय आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.