जाणता लाजा


राजे आवेशात म्हणाले ‘आम्ही बिल्लीचा तख्त जिंकला. आता आम्ही या देशाचे लाजे झालो’. अस म्हटल्या म्हटल्या राजांचा पुतण्या धावत येऊन महाराजांना ‘राजे, उठा’. राजांचे डोळे उघडले. आणि पाहतात तर राजे अंथरुणात. राजे मोठ्याने म्हणाले ‘आम्हाला कोणी इथे आनले?, बोल रे हारजीत आम्ही कुथे आहोत?’. ‘बारामतीच्या गडावर’ पुतण्या हारजीत उत्तरला. तेवढ्यात कोणी तरी दासी आली आणि म्हणाली ‘महाराज, आपल्याला बडी बेगमने याद केले आहे’. हे ऐकल्या बरोबर महाराज घाईघाईने कमरेची गुढघाभर लांब बाहेर आलेली नाडी आत खोचत ‘आलो आलो’ म्हणाले. तेवढ्यात तिकडून सुलेबाई ‘अहो, निदान सदरा तरी घाला’. महाराज म्हणाले ‘अरे हो, विसरलोच. अरे छगन, दे रे तुझा!’ छगनराव नाईक लाजले ‘आम्ही नाही जा!!!’. राजे त्यांच्या स्पष्ट भाषेत म्हणाले ‘अले, आता देना. नाही तरी तकडे गेल्यावर ती माझी उतरवरानारच आहे’. छगनराव नाईकांनी ताबडतोप आपला सदरा काढून राजांना देतात. राजे सदरा घालतांना मोठ्या आवाजात ‘आता तू जर नीट दिला नसता, तर राडा केला असता’.

हे ऐकताच बाहेर असलेला महाराजांचा गृहरक्षक आबा महाला मोठ्याने तोंडाचा दांडपट्टा चौफेर चालवत म्हणाला ‘कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. जे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई केल्याशिवाय राहाणार नाही’. असे ऐकल्यावर हारजीत चिडला ‘ए नाद करायचा नाय..’. महाराज नुसतंच हसत निघून गेले. दिल्लीत विमान उतरले. राजे विमानातून उतरले. बाहेर त्यांचा खास दूत बहिर्जी पटेल त्यांच्या स्वागताला उभा होता. महाराजांच्या आवडीची धान्यापासून बनवलेली दारूची पेटी महाराजांच्या हातात देऊन त्याने त्यांचे स्वागत केले. महाराज थोडंस हसून बहिर्जीला ‘काही खास खबर?’. बहिर्जी पटेल काकुळतीला येऊन ‘राज, तुम्ही एकटे जाऊ नका. आम्हांसी सोबत घ्या. त्या बेगमने तुम्हास ठार करण्याचा बेत आखला आहे. तुम्हांसी दगाफटका होऊ शकतो’. राजे उत्तरले ‘आम्हास फ़क़्त केंसल दगाफटका करू शकतो’. ‘पण तो, मनमोहन खान’ अस म्हणत असलेल्या बहिर्जीला थांबवत राजे म्हणाले ‘चिंता कालू नकोस. आम्ही सुखरूपपणे पलटू. जय सत्तावादी!’. बहिर्जीने महाराजांना ‘जय सत्तावादी’ म्हणाला.

महाराज दहा जनलाथ वर पोहचले. प्रवेश करताच मनमोहन खानने हसून ‘आओ राजा सरद आओ’. महाराज एकटक बघत म्हणाले ‘मी इथ बेगमच्या हुकामावर आलो आहे’. ‘मला बेगमनेच पाठवलं आहे. तुमच्याशी बोलायला’ खान म्हणाला. ‘बोला खान, कशासाठी बोलावलंत आम्हाला’ राजे उत्तरले. खान म्हणाला ‘बेगम तुमच्यावर खफा आहे. तुम्ही चालवलेले उद्योग आता बंद करा. नाहीतर बेगम तुम्हाला संपवल्याशिवाय राहाणार नाही. मलिका ए हिंदोस्ता स्वराज्यातील सगळे किल्ले आणि गड त्यांच्या राज्यात पाहण्यास उत्सुक आहेत’. राजे क्षणभर थांबले आणि खानला म्हणाले ‘आम्ही शेतकऱ्यांच्या भल्याचे करतो आहोत. त्यांच्या सुखासाठी आम्ही आमचा प्राण ही द्यायला तयार आहे.’ मध्येच थांबवत खान म्हणाला ‘अरे सरड्या, सगळीकडे तुझ्यामुळे भाववाढ झाली आहे. रयत आणि शेतकरी आत्महत्या करीत आहे.’ हे ऐकून राजे म्हणाले ‘आम्ही तुमच्या कॉगलाईत मिसळून आमचे अस्तिव संपुष्टात आणणार नाही’.

खान म्हणाला ‘तू एक तरी धडाच काम केलेलं सांगशील का?’ राजे हसले आणि खानला बाटली दाखवत म्हणाले ‘यात काय आहे माहिती आहे का?’ खानने विचाराल ‘काय ?’ राजे म्हणाले ‘ही खास धान्यापासून बनवलेली दारू आहे’. ‘काय सांगता?’ खान म्हणाला ‘मी तर ऐकल होत तुम्हाला कायद्याने दारू बंदी घातली होती’. राजे म्हणाले ‘कायदा? अरे खाना, स्वराजाचे कायदे आम्ही बनवतो. दारू प्यायला बंदीचा कायदा आहे, पण बनवायचा नाही.’ खान हसला आणि म्हणाला ‘बोहोत खूब, पण तरीही तुला आमच्या कॉगलाईत सामील व्हावेच लागेल’. राजे चिडले आणि म्हणाले ‘लक्षात थेवा, त्यो कसाब माझ्या कसबमुळे कसाबसा जीवंत आहे. आणि त्या साध्वी माझ्यामुळे अडकून आहे. आणि मला तुम्ही म्हणत असलेल्या सगल्या गोष्टी माहित आहेत. म्हणून तर माझे कावळे मला जाणता लाजा म्हणत असतात. पण तुम्ही मला काही दगा फटका केला तर..’ खान म्हणाला तू काय करू शकत नाही. चल ये जवळ ये लाजू नको.. खानने राजाला आलिंगन दिले. राजाने आलिंगन देताच खानने राजाच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीराने छगनरावनी दिलेला सदरा फाटला. हे पाहताच राजाने आपले हाताच्या बोटांनी खानला गुदगुल्या करायला सुरवात केली. खान गडबडला आणि मोठ्याने हसत ‘दगा दगा’ ओरडला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.