जोडधंदा


गेले काही दिवसांपासून विचार करतो आहे. किती दिवस असे दुसर्याच्या मळ्यात मजुरीची कामे करायची? दुसर्याची शेती कितीही कसली तरी, येणारे उत्पन्न त्याचे आणि मिळणारा मोबदला त्यामानाने पोटभर अन्न पुरवणारा. आणि समाधान नाही. त्यामुळे सोबत काहीतरी जोडधंदा करावा अस वाटते आहे.

पुढे चालून, जोडधंदा वा जोड व्यवसायातून मिळणारे उत्पन्न पाहून तोच मुख्य व्यवसाय करावा असा विचार मनात घोळतो आहे. साधी गोष्ट आहे. स्वतःची शेती कसली तर, आज ना उद्या त्यातून काही तरी उगवेल. आणि कदाचित उद्याचा काळ वर्तमानाहून चांगला असेल. आणि सर्वात मुख्य गोष्ट अशी की, पोट भरण्यासोबत समाधानही मिळेल. ते महत्वाचे. दुसर्याच्या मळ्यात मालकाच्या इच्छेने कामे करावी लागतात. इकडे, मळ्याचा राजाच की. त्यामुळे काहीतरी सोबत उद्योग सुरु करावा, यावर विचार चालू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.