झोप


आज कामाच्या दिवशी साडेनऊला उठण्याचा भीम पराक्रम केला. त्यामुळे कंपनीची लेट मोर्निंगची बस देखील चुकली. आता रात्री तीन वाजता झोपल्यावर लवकर कशी जाग येणार? मला खरंच काहीच सुचेनासे झाले आहे. गेल्या महिन्यापासून मला तीन वाजेच्या आत झोपच येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर खूप आळस येतो. आणि आता माझा चेहरा काळवंडून गेला आहे. ओठ देखील तसेच. दिवसा मी झोपत नाही. तरी सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत झोपच येत नाही.

दोन दिवसांपूर्वी विचार केला त्यावेळी अस वाटलं की, शारीरिक त्रास काहीच नसल्याने अस होत असेल. म्हणून शंभर जोरचे दोनशेवर नेले. तरी सुद्धा झोप येईना. मुळात त्रास वाटत नव्हता. काल चिंचवड मधून निगडी, निगडीतून पुनः चिंचवड. मग पुन्हा निगडी. आणि तिथून चिंचवड स्टेशन आणि तिथून पुन्हा घरी. असा जवळपास दहा किमीचा पायी प्रवास केला. घरी आल्यावर पाय दुखायला लागले. पण तरीही झोप आली नाही. आज बसने येतांना दिसेल ‘तिला’ पाहत आलो. असो, पण कोणीच छान वाटले नाही. आज मी तिच्या डेस्ककडे बिलकुल पाहिलेले नाही. पण कॅन्टीनमध्ये तिला पहिले. म्हणजे तिची लक्ष नसतांना.

आज देखील खूप छान दिसते आहे. यार, काय चालले आहे. काहीच सुचत नाही आहे. माझ्या मित्राशी बोललो या विषयावर. त्याचे आपले नेहमीचेच. मला म्हणाला तू तिच्यात खूप जास्त इंव्होल्व झाला आहेस. म्हणून अस घडत आहे. आणि तेच आपले जुने ती मला मिळणे कसे शक्य नाही यावर लेक्चर. मला माझ्या कंपनीत तीन चांगले मित्र आहेत. एक आहे तो तिचा नाद सोड म्हणून नेहमी बोलत असतो. दुसरा जो हो आणि नाही दोन्ही बोलतो. म्हणजे दोन्ही बाजूच्या शक्यता वर्तवतो. आणि तिसरा जो मला पाठींबा देतो. मला वाटलेलं की मी कोणत्याच मुलीकडे पाहत नाही म्हणून मला ती छान वाटते. म्हणून आज खूप मुलींना पाहिलेलं. पण कोणीच छान वाटेना.

आता माझ्या मित्राशी फोनवर जवळपास तासभर या विषयावर बोललो. त्याने बर्यापैकी समाधान केले. मला म्हणाला, तुझ्या इच्छा वाढत आहेत. आणि त्यामुळे तुला समाधान मिळत नाही. आणि त्यामुळे झोप येत नाही. यावर उपाय काय बोललो तर म्हटला, जे आहे त्यात समाधान मानायचे. असो, आता ते कसे करायचे हे मात्र नाही सांगितले. काल रात्री झोप येत नाही म्हणून वडिलांनी सांगितलेला जपाच्या पंधरा माळा केल्या. आज ती खुश आहे. पण मला खूप तिला पाहण्याची इच्छा होते आहे. काय करू? मला त्रास द्यायचा तिला. झोपेच काय करावे तेच कळेनास झाल आहे. आज झोपेच्या गोळ्याचा उपाय करून पाहतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.