ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!


ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो!

मान्य आहे कदाचित अतिरेक होत असेल! पण एक गोष्ट नक्की! कोणत्याही चुकीच्या पद्धतीने मी आजवर व्यक्त झालेलो नाही! टीका झाली आणि केली. परंतु, कधीही व्यक्तिश: चांगले संबंध ठेवण्यावर आजवर भर दिला.

काहीजणांनी स्नेह संबंध ठेवले. काहींनी तोडले! परंतु त्यांच्याबद्दल कोणताही आजही पूर्वग्रह ठेवलेला नाही. कायदा पाळतो व सर्वांनी पाळावे संबंधी आग्रही असतो. मग ते रस्त्यावरील नियम असोत वा कचेरीतील! आजवर जो स्वभाव प्रत्यक्षात आहे तोच ब्लॉगच्या माध्यमातून आणि तोच ट्विटरवरदेखील!

जे मनात तेच प्रत्यक्षात हेच धोरण पाळले. मग विषय मुंबई/पुणे पोलिसांनी शासकीय खात्यांवरून मराठी वापरण्यासंदर्भात असोत! जे योग्य आहे त्याचीच बाजू घेतली! यात कधीही द्वेष नव्हता! होता तो मराठीचा आणि कायद्याचा आग्रह.

जी मते पटली नाहीत ती कधीही मान्य केलेली नाही. माझा जिवलग मित्र! दरवेळी आमच्या भेटीत राजकीय विषयावर अनेकदा चर्चा घडते. परंतु आजवर कधीही त्यामुळे आमच्यात दुरावा निर्माण झालेला नाही. मैत्रीचे वय विचाराल तर एका तपाहून अधिक काळ लोटला आहे.

इथं अनेकदा मारण्याच्या धमक्या मिळाल्या. पण प्रत्यक्षात कधी तोंड दाखवले नाही! होय मी मराठीवादी आहे. मराठीमय महाराष्ट्र करणे ह्याच ध्येयाने पछाडलेलो आहे! तेच प्रतिबिंब ट्विटरवर व प्रत्यक्षात दिसते. चांगली गोष्ट अशी की, कायदे देखील मराठीच्या बाजूने आहेत.

ट्विटरचे मोठे माध्यम आहे! त्यावर मोठा वर्ग आहे. तिथे मराठीचे मुद्दे मांडणे वा हक्काच्या विषयावर बोलणे गैर नाही. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे. त्यामुळे इथे आग्रह आणि सक्ती केली जाणे नैसर्गिक आहे. समस्त शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे मान्य करणे आवश्यक आहे!

दमनशाही करत खात्याचे निलंबित करून काहीच साध्य होणार नाही! ज्या ज्या गोष्टी मी ऑनलाईन तक्रारी करून करीत होतो. त्या प्रत्यक्षात होतील! लक्षात घ्या कायदा मी नाही तुमचे कंत्राटी आस्थापने मोडत आहेत!

हा लढा पुढे अखंड चालणार! हेमंत असेल नसेल पण हे थांबणारे नाही! माझे ध्येय स्पष्ट आहे!! माझा लढा मराठीसाठी आहे आणि ही फक्त सुरवातच आहे!!

,

6 प्रतिसाद ते “ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!”

  1. म्हणूनच समाजमाध्यमांवर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही हेमंत! त्यासाठी आपण स्वतः होस्ट केलेली अनुदिनी अथवा संकेतस्थळ सर्वोत्तम! त्यावर आपण विसंबून राहू शकतो! बाकी तुझ्या महाराष्ट्रवादी विचारांना पाठींबा आहेच!

    • धन्यवाद रोहन! तुझ्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे! कोणतेही कारण न देता असं खात उडवणं योग्य नव्हतं! यातून ट्विटर किती पक्षपाती आहे याचा अनुभव आला आहे!

  2. आपलं खातं बंद करणं हे अनपेक्षित आहे.. कायद्यानुसार मराठी भाषेची मागणी करणे हा मूलभूत हक्क आहे, याबाबत आपण प्रसार प्रचार करता ह्या गोष्टी तर सन्मानास पात्र ठरता.. पण ट्विटर बाबतीत तरी इथे सरकारचा हस्तक्षेप स्पष्ट दिसत आहे, निषेध होणारच..!!!!!

  3. दु:ख या गोष्टींचे आहे की महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होत आहे व सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. त्यांचे सोडा.. मराठी साहित्यिक व विचारवंत मराठीसाठी आग्रह धरताना दिसत नाहीत. हरकत नाही.. कोंबडा झाकून ठेवला तरी तो आरवायचा रहात नाही. आपल्या धाडसीपणाचे कौतुक व मुक्त विचारांचे समर्थन.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.