डाळ


परवा चिंचवड गावात एका दुकानदाराला मसूर डाळीला पॉलिश करून ‘तुरडाळ’ म्हणून विकताना आरोग्य खात्याने पकडले. आता कारवाई होईल याची खात्री नाही. आता तुरडाळ किती महत्वाची हे सांगायला नको. एका बाईने ती तुरडाळ खरेदी करून घरी आली. धुतल्यावर त्याची पॉलिश निघून गेली. मग हा सारा प्रकार उघडकीस आला. असो, असं चिंचवडमध्ये सर्रास चालू आहे. याच आठवड्यात चिंचवड रेल्वेस्टेशनच्या समोर असलेल्या पुलाखाली एका तरुणाला ठेचून मारले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह पहिला. सोडा, आता बघून काही वाटत नाही. महिन्यात एक घटना पुण्यात घडतीच. काल ‘पोलीस तपास करीत आहेत’ अशी बातमी वर्तमानपत्रात आली होती. सगळ्याच ठिकाणी असं घडत असत. त्यामुळे कोणालाच काही वाटत नाही. काल सकाळी रेल्वे स्टेशनवर येत असताना इथ निवडून आलेल्या बंडखोर उमेदवाराच्या अभिनंदनाच्या पोस्टरवर चक्क दादांचा फोटो.

आता पुण्यातील महानगरपालिकेत भारताच्या नकाशात काश्मीर नसतो. प्रत्येकाची डाळ कुठे न कुठे शिजत असते. राष्ट्रवादी ह्या पक्षाचे नाव बदलून ‘सत्तावादी’ किंवा ‘निवडणुकावादी’ ठेवायला हवे.  असो, आपण राजकारणावर काही नाही बोलाल तेवढ चांगल. जिंकल्या पक्षाला देखील आपण जिंकून कसे आलो याचा प्रश्न पडला असेल. हरलेले पक्ष आम्हालाच दोष देत आहेत. म्हणे  ‘मराठी तरुणाने’ पराभव केला. उद्धव ह्यांचे व्यक्तिमत्व मला आवडते. त्यांचे विचार देखील पटतात. शिवसेना मराठी पक्ष आहे याचा मला अभिमान आहे. पण राज ठाकरे उद्धव ठाकरे पेक्षा अधिक प्रिय वाटतो. दिवाळी खूपच छान गेली. बाकी नंतर बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.