डियर


नाचावस वाटत आहे. काहीच सुचत नाही आहे. कालचा तो दिवस ‘वाळवंट’. आणि आज काय बोलू ‘धबधबा’. आज तिने मला गुड मोर्निंगचा मेल केला. आणि मी पिंग करून गुड मोर्निंग केल्यावर ‘हाय डियर, गुड मोर्निंग’ केल. बस अजून विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे ती मित्र म्हणून म्हटली असेल कदाचित. पण काही का असेना. आज ती इतकी छान दिसते आहे म्हणू सांगू. बस तिलाच पहाव अस वाटत आहे. काल कसला गेला. रात्र देखील बेकार. विचारांनी डोके पकवून टाकलेले. त्यात हे सल्ले. काय म्हणतात त्याला ‘वॉट अन् आयडिया’.

माझा मित्र ‘स्मॉल बी’ मला तिला डायरेक्ट प्रपोझ कर म्हणून सल्ला देत होता. आणि मग त्याच्या मित्राने कस एका मुलीला ‘पटवलं’ त्याचे किस्से सांगत बसला. रात्री बहिणाबाई ‘नशिबात असेल तर नक्की मिळेल’ अस बोलली. काल एक वेळ अस वाटायला लागले होते. जगण्याला काहीच अर्थ नाही. ती मिळणार नसेल तर.. आज सकाळी देखील खूपच उदास वाटत होते. माझा एक मित्र काल ‘तू पिंग केले नाही म्हणून तिने तरी करायला हव होत पिंग. याचा अर्थ ती तुझ्यात थोडी सुद्धा इंव्होल्व नाही आहे’. अस म्हणालेला. खर सांगायचं झालं, तर तिच्याकडून मी कशा काही अपेक्षा करू शकतो? मी तिच्या प्रेमात पडलो आहे, ती आहे की मला काहीच माहित नाही. कस ओळखणार तिच्या मनातलं? आज मी दुपारी त्या नवीन कॅन्टीनमध्ये नव्हतो गेलेलो. इति श्री मित्र आग्रह. तिला राग आला नसेल ना? काय माहित. तिच्याशी बोलायची खूप इच्छा होते. पण ती कायम बिझी असते. मग पिंग कस करू? असो, माझ्या मनातलं मी तिला नक्की सांगेन. मी इतका सुद्धा भित्रा नाही. पण थोडी अजून हिम्मतीची गरज आहे. ती झाली की सांगेन.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.