तीर् नयनाचे


आताचा रविवार, परत आयुष्यात येऊ नये हीच प्रार्थना. या रविवार माझ्यावर किती वार, तीर् सोडले गेले असतील याची कल्पना तुम्हाला यावरूनच येऊ शकते की माझे मागचे पोस्ट आणि हे यातले वेळेचे अंतर. नेमक काय आणि कस घडल हे कळायला मार्गच नाही. सकाळी सकाळी तुम्हाला कोणत्या तरी मैत्रिणीचा फोन येतो. तुम्ही तो फोन साखारझोप सोडून उचलता. पण फोनवर काहीच आवाज येत नाही. आणि तुम्ही मुर्ख सारखे हेलो हेलो करत बसता.

नंतर स्वत फोन कट करून झोपी जाता. आणि मग काय स्वप्नात पण तोच विचार. उठून आवरून तुम्ही त्या मैत्रिनिला फोन करता. पण फक़त रिंग वाजते. ती काही, फोन उचलत नाही. मग तुम्ही तुमच्या पुढच्या कामाकडे वळता. पण काय उपयोग त्यात देखील तिने फोन का नाही उचलला याचाच विचार होतो. मग तुम्ही कामाच्या टिकणी जाउ न काम संपावता. पण विचार काही संपऊु शकत नाही. मग मनात तुमच्या वेगळे वेगळे विचार यायला सुरवात होते, की तिला काही आपल्याला म्हणायचे होते?, का ती आपल्यावर रागवली आहे? असे अनेक प्रश्नानी डोके दुखु लागते. मग ती डोके दुखी जावी म्हणून तुम्ही तुमच्या मित्राला फोन करता.

मग त्याच्याच बरोबर दुपारचे जेवण आटोपून गप्पा मारता. मग त्याच्या म्हणण्यावरून तुम्ही सारस बागेत जाता. आणि मग काय तुमचे डोकेच काय पण डोळे, हे देखील घायाळ व्हायला लागते. त्याबरोबर तुमचे हृदय देखील!!!. एक एक सुन्दरि तुमच्या मनाचा तिच्या कोमल नेत्रा नि वेध घेते.

कोणी सुन्दरि तिच्या जोडीदारासोबत प्रणय सुखात पाहून तुमचे कळिजाच खलास होते. काय करव आणि काय नको हेच उमगत नाही. मग काय असेच बराच काळ सुरू राहते. तुम्ही एक एक सुंदरीला बघून आपल्या भावी आयुष्या बद्दल स्वप्न रंगवायला सुरवात करतात. आणि त्यातच तुमचा मित्र तुम्हाला एक त्याच्या गावकडची मुलीचे लग्नानंतर चे लफाड्याबद्दल खरी वास्तववादी कथा सांगतो. आणि म्हणतो की मुली अशा पण असतात. एकूण मन सुन्न होऊन जाते. मग तुमच्या कडे वेळ असल्याने तुम्ही फिरायला निघता. नदीच्या कडेने जाताना तुम्हाला पुन्हा प्रेमिका आणि प्रियकर दिसतात. त्याना पाहून तुमच्या मनात काहूर माजते. तुम्ही मनात येणारे वाईट विचार टाळण्यासाठी प्रयत्न करता.

जिकडे तिकडे तुम्हाला असेच प्रेमिका आणि प्रियकर दिसल्याने तुम्हाला विचारांचा आणि त्या सोबत जाता येता दिसणार्‍या मुली आणि त्यांचे सौंदर्य पाहून होणारे वार असह्य व्हायला लागतात. तुम्ही घरी जाण्यासाठी निघता. मग घरी जनतना तुम्हाला सकाळच्या तुमच्या मैत्रिणीची आठवण पुन्हा सतवायला लागते. मग मन पुन्हा बेचैन होते. आणि शेवटी तुम्ही न राहून तिला फोन करता. रिंग वाजत राहते, श्वास वाढत चालतो. आणि पुन्हा तेच. ती काही फोन उचलत नाही. तुम्हाला नाही नाही ते विचार मनात यायला लागतात. की काय झाले नेमके?, काही चुकले तर नाही ना. ती आपल्या बद्दल काही चुकीचा तर विचार करत नसेल ना ?. पुन्हा विचारांचा सागर उसळयला लागतो. मग ही सुनामी थांबावण्यासाठी तुम्ही तिला मेसेज करता. की काही चुकले असेल तर माफ कर म्हणून. मग त्यानंतर,…. हृदयाचे ठोके अधिकच तीव्र होण्यास सुरवात होते. तिचा काहीच रिप्लाइ येत नाही .

तुम्ही दुखी होऊन घरच्या दिशेने निघता. आणि तिचा मेसेज येतो. ‘मी काही रागवाले नाही. मी सध्याला कामात मग्न आहे. कारण आमच्या घरी काही पाहुणे आले आहेत. क्षमस्व’हे वाचून तुम्ही आणखीनच गोंधालत पडता. आणि न जेवताच तुम्ही झोपी जाता. दोन दिवस तुम्ही ह्या विषयाला धरून बसल्याने तुमच्या कामावर परिणाम होतो. आणि त्याचे बक्षीस म्हणून तुम्हाला साहेबांचे बोलाणेपण खावे लागते. आणि हा अर्थहीन रविवार तुमच्या 3-4 दिवसांचा नाहक अनर्थ करतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.