‘ती’ ची आई


काय करू ती चा विषय डोक्यातून जाताच नाही. आज मी रक्षाबंधन निमित्ताने संध्याकाळी माझ्या लहान बहिणीकड़े गेलो होतो. काकाने आज जेवायलाच बोलावले होते. जेवण खुपच छान होते. जेवण करत असताना मी न राहून काकाला ती च्या बद्दल विचारले, की ती कशी आहे. आली होती का घरी? काका म्हणाला मला तीची आई म्हणाली की ती तुझ्या तिकडेच (मी जिथे राहतो त्या भागात) रहाते. आणि तीला एकदा भेटून या असे त्यानी सांगितले. मग तू भेटलास अस विचारल्यावर तो म्हणाला जाइल. काकाच्या एकुणच बोलण्यावरुन फारच दुखी किंवा काही वाटते अस काही वाटल नाही.

मला खर तर अजुनही तीच लग्न झाल हे खरच वाटत नाही. आणि निद्रा मावशी आजकाल फार उशिरा येतात. आणि कंपनीत पण मन कामात लक्ष घालण्याचे नाव घेत नाही. आणि मन न होणारे विचार करते. कधी वाईट तर कधी न सत्यात येणारे. आणि मग माझीच मला लाज वाटते. आणि कधी खुप राग येतो. पण खर सांगतो की मी तीला विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. आज जेवण चालू असताना काकू आल्या. नारळी भात केला होता तो द्यायला. माझ जेवण झाल्यावर त्यांच्या मोठ्या भावाचा (तिचा मामा) मोबाइल चार्जिंग होत नव्हता ते बघ म्हणुन. मी बघितला तो मोबाइल पण कुठे काही चुकीचे वाटले नाही. मी त्याना बैटरी कस्टमर केयर मधे दाखवा असा सल्ला दिला. नंतर असाच काकूशी गप्पा मारत होतो. खर तर त्यानीच तिचा विषय काढला. काही झाल तरी त्या तिच्या आई आहे ना. मला म्हणाल्या की तिने कोर्ट मैरिज़ केल. तिचे वडिल तीला म्हणाले आता कधीच इथे येऊ नको. आणि आम्हाला तोंड पण दाखवू नको. आणि आम्ही पण कधी तुला भेटणार नाही. हे सगळ एकताना स्वप्न पाहतोय की काय असा भास होत होता. त्यांच्या आवाज खोल झाला होता.

आईच प्रेम काय असत? किती आई तिच्यावर प्रेम करते. तीनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेलच ना. असे प्रश्नंणी मला भंडावून सोडले होते. काकूना मी समजावण्याचा प्रयत्न केला की, प्रेम विवाह किंवा आन्तर्जातीय विवाह होताच नाही अस नाही. माझ्या कंपनीत जवळपास सगळ्यांचे असे प्रेम झाले आणि आन्तर्जातीय विवाह त्यानी केले आहेत. आणि माझ्या मते यात काही वाईट नाही. त्याना मी विचारले की तो (तिचा पति) काय करतो?. त्या म्हणाल्या तो देखील शिक्षक आहे. मी मनातून थोडा समाधानी झालो की निदान तो काही तरी कमावतो. त्याना मी पुन्हा विचारल की तो ती ज्या शाळेत आहे तिथेच आहे का?. तर त्या नाही म्हणाल्या. एकून थोडी शंका आली की तो जॉब करतो का?. पण मी त्याना असे काहीही विचारले नाही. काकू पुढे म्हणाल्या की तू मधे कधी तरी फ़ोन कर तीला. विचार की कस चालले. मी हो म्हटल. पुढे त्या म्हणाल्या की ती च्या छोट्या बहिणीचे थोड़े अवघड होइल पण आता आम्ही दिवाळी नंतर बघायला सुरवात करणार आहोत.

मला आता खरच काय बोलावे हे कळले नाही. त्यांच तिच्या बद्दलच प्रेम बघून मला खरच मीच चुक केली की काय अस वाटतय. जर मी माझ्या मनातल तीला सांगुन टाकल असत तर.. कदाचित हे टाळला नसत गेल, पण कुठे तरी तिने याचे मला संकेत दिले असते. आणि तिच्या घराच्याना जेवढा आता त्रास सहन करावा लागतोय तेवढा तरी सहन करावा नसता लागला. काकुंनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या तिच्या लग्न बद्दलच्या. पण..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.