त्रास


खूप डोक दुखत आहे. काय करू खरंच, काहीच सुचत नाही आहे. ती आज एकदाही भेटली नाही ना बोलली नाही. दिवसभर कामात बिझी. सकाळी देखील तिचे मित्र आणि मैत्रीण माझ्या डेस्क जवळून गेले. पण ती नाही गेली. मला वाटलं होत, ती सुद्धा येईल. पण नाही आली. कॅन्टीनमध्ये सुद्धा ती नव्हती आज. जेवायची इच्छाच होत नव्हती. असो, मुडच नाही आहे काही बोलायचा. काय करू यार, जेणेकरून तिला मी आवडेल? मला खरंच आता नाही सहन होत यार. आता कंपनीतून लवकर याव असा काही विचार नव्हता. पण तिथे. यार, मला शंका वाटते, माझा तिला त्रास तर होत नाही ना. म्हणजे मी तिला पिंग करत असतो. मेल पाठवतो. त्यामुळे तर ती माझ्याशी आज अस! कदाचित असेलही.

मी सारखा तिच्याकडेच लक्ष. साधे पाणी आणायला चालले की, तिच्याकडेच लक्ष माझ. त्यामुळेच ती रागावली असेल. मला तिला बिलकुल नाराज नाही करायचं. आज दुपारी एका मोठ्या कंपनीचा मुलाखतीसाठी फोन आलेला. उद्या बोलावलंय. पण मी नाही जाणार. तिच्यापासून मला नाही दुसरीकडे कुठे जायचं. आणि दुपारी मित्रासोबत कंपनीच्या इमारतीच्या भोवती मित्रासोबत फेरफटका मारतांना आलेला. माझ्या डोक्यात तिचाच विचार घोळत होता. आणि मी आपला फोनवर त्या ‘महाराणी’ला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत होतो. फोन ठेवल्यावर लक्षात आल. की मी कोणाशी काय काय बोललो आहे ते. ज्या सोफ्टवेअरचे काहीच ज्ञान नाही त्याचा मी तिला अनुभव आहे अस म्हटलं आहे. आणि साधा एक ‘टॅग’सुद्धा माहित नाही. आणि मी तिला त्यातल्या फ्रेमवर्कची माहिती आहे अस सांगून बसलो. खोट बोललो. म्हणजे मी खोट बोलत नाही अस नाही. पण हे इतकं खोट?

माझ्या नाही लक्षात आल की मी काय बोलतो आहे. वाटलं तिला सांगाव. पण तिने पिंग नाही केल. मग माझा मूड अजूनच गेला. दोन दिवसांपासून ती संध्याकाळी मला स्वतःहून पिंग करायची. वाटलं आज केल की सांगू. पण ती ‘अवे’. मग मी सुद्धा कंपनीतून ‘ऑफलाईन’ झालो. आणि आता घरी आलो तर तिची पुन्हा आठवण येते आहे. आज ती एकदाही माझ्याकडे पहात गेली नाही की, माझ्याशी काही बोलली. दुपारी बहिणाबाईसोबत बोलत होतो. ती सुद्धा, तेच म्हणाली की तीचा होकार मिळेपर्यंत घरी काही सांगू नको. पण आज तीच्या वागण्याने मला खरंच खूप चिंता वाटते आहे. मला तिला त्रास नाही द्यायचा. असो, सोमवारपासून तिची इच्छा असेल तरच. स्वतःहून काही नाही करणार. जर तिला नसेल आवडत मी मेल पाठवणे, किंवा पिंग करून गप्पा मारणे. आणि तिच्याकडे पाहणे सुद्धा. तर नाही त्रास देणार. खर तर मला आता काहीच नाही सुचत आहे. तीचा आणि माझ्या ड्रेसचा रंग सारखा होता. सुरवातीला खूप छान वाटलेलं. पण दिवसच बेकार होता.

असो, बसमध्ये देखील एक बाजूच्या सीटवरची ‘ताई’. यार या ताई लोकांना माझ्यात अस काय दिसते की जे अप्सराला दिसत नाही? सोडा, ती ताई माझ्याकडे पहात होती. मला जाग आली त्यावेळी पाहतो तर ‘अप्सरा’ असल्याचा भास झाला. माझी झोपच उडाली होती. खूप डोक दुखत आहे. आणि काय बोलावं ते सुचत नाही आहे. नंतर बोलू.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.