दादांची वाढदिवसाची भेट


‘जाणता पुतण्याचा’ फोन वाजला. डोळे चोळत अंथरुणातून पुतण्याने कुणाचा पहिला तर ‘काकांचा’. गडबडून गजराचे घड्याळ बघितली आणि ताबडतोप फोन उचलून ‘काका बोला’. तिकडून  ‘आले वाढदिवसाच्या शुभेच्छा!’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा माणूस आहे!’. पुतण्या ‘हो! अगदी, म्हणून तर पक्षाचे चिन्ह..’. तिकडून काकांनी आवाज वाढवत ‘आले, ते घड्याळ तुझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. तुम्ही लोक खूप आळशी आहात. म्हणून मी ते घड्याळ घेतले’. ‘माफ करा काका’ पुतण्या उत्तरला. काका करड्या आवाजात ‘माफी असावी, अशी आर्जव किती करणार? परपक्षीय लोक जास्त सीट आणतात हे त्यांच्या हुशारी आणि शिक्षणामुळे..’.

तेवढ्यात काकांच्या घड्याळाचा ‘पररsssss’ असा गजर वाजायला लागला. ‘चल, आता मला मिटिंगला जायची वेळ झाली’. पुतण्याने ‘कृषीमंत्रालयात का?’. ‘आले, मला वेळ फालतू गोष्टीत वाया घालत नसतो. आयसीसीची मिटिंग आहे, लंडनला! चल मी कलतो तुला नंतर फोन’ काका उत्तरले. ‘हो’ म्हणून पुतण्याने फोन बंद केला. आवरून पुतण्या भानामतीवरून पुण्याला यायला निघाला. सोबत चमचे, वाट्या बरोबर होत्याच. एका वाटीने पुतण्याला विचारले ‘दादा..’ पुढे काही बोलणार तेवढ्यात पुतण्या बोलला ‘कितीदा सांगितले मी तुला, की मला दादा म्हणायचे नाही’. वाटी ‘पण तुम्हाला तर सगळेच दादाच म्हणतात’. काका त्रासलेल्या चेहऱ्याने ‘तिथेच तर घोडे मारले… काकांनी माझे नाव असे… काकांनी किती मोठी चूक केली. आणि त्याची शिक्षा मी भोगतो आहे’.

वाटीने ‘कस काय?’. ‘बघ ना, राज आणि राहुल किती पॉप्युलर आहेत तुम्हा बायकांमध्ये.. आणि मला भेटायला कोणी आले की, मला दादाच करून टाकतात’ पुतण्या पडक्या चेहऱ्याने बोलला. चमच्याने वाटीकडे बघून ‘तोंडावर बोट’ ठेऊन शांत बसण्याची खूण केली. विषय बदलण्यासाठी चमचा पुतण्याला म्हणाला ‘पुढच्या आठवड्यात तुमचा वाढदिवस आहे. आपण मोठ्या प्रमाणात साजरा करू. सार्या पक्षाला कळायला हव! पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच म्हणून’. ‘तोच मी सुद्धा विचार करतो आहे. पण या वेळी काही तरी सगळ्यांपेक्षा वेगळ असायला हव. काय करू? पण ते सुचत नाही आहे’. दुसरा चमचा ‘महाराष्ट्र दौरा’. अस म्हणताच पुतण्या ‘मग ते बाळासाहेबांच्या पुतण्याची नक्कल केल्यासारखी होईल. आणि मग तो त्याच्या लाखांच्या सभेत माझीही नक्कल करेल, नको ते नकोच.’ एका चमच्याने ‘समाजकार्य करा’. पुतण्या आता मात्र भडकला ‘च्यामारी, तुला काय मी समाजकार्य कधीच करत नाही अस वाटत नाही का? आणि मी काय आता लोकांना दाखवण्यासाठी घमेले उचलू? मी काय राहुल गवंडी वाटलो काय रे?? पुण्यातील सगळ्या नाही, सगळे पश्चिम महाराष्ट्र कशामुळे उंच उंच वाढतो आहे? आणि कोणामुळे इंच इंच विकला जातो आहे? का रे? देऊ का एक..’. ‘काही तरी नवीन आयडिया सांगा की रे’ पुतण्या काकुळतीने बोलला. खिडकीतून बाहेर बघितले तर गाडी ‘ल मेरेडीयन’मध्ये शिरली.

पुतण्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. तेवढ्यात पुतण्याचा फोन वाजला. पुतण्याने फोन उचलून ‘हलव’. तिकडून ‘दादा, मी राज्य जलसंपदा विभागातून बोलतो आहे. आपण आज तातडीची मिटिंग बोलावली होती. म्हणून सगळे अधिकारी लोक आले आहेत’. ‘अरे हो, मी थोडा आता कामात व्यस्त आहे. त्यामुळे रद्द केली म्हणून सांगा सर्वांना’ पुतण्या उत्तरला, आणि फोन बंद केला. जेवण झाल्यावर ‘ल मेरेडीयन’ मधून गाडी बाहेर पडली. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला, पुतण्याने फोन उचलला. तिकडून ‘मी पुण्याचा आयुक्त बोलतो आहे. तुम्हाला आत्ता माझ्या कार्यालयात यायल जमेल का?, कारणही तसेच महत्वाचे आहे’. ‘ठीक आहे’ म्हणून पुतण्याने ड्रायव्हरला गाडी आयुक्ताच्या कार्यालाकडे वळवायला सांगितली.

गाडीतून उतरताच बाजूला ‘भाई’ची गाडी बघून पुतण्या भडकला. तडक आयुक्ताच्या केबिनमध्ये शिरला. पाहतो तर आयुक्त, जल संपदा अधिकारी आणि भाई बसलेले. ‘काय कारण आहे, सांगा!’ पुतण्या आयुक्ताकडे बघून बोलला. आयुक्त म्हणाले ‘पावसाच्या वेळेवर न पडण्यामुळे पुण्याची धरणांतील पाणीसाठा पंचवीस दिवस पुरेल इतकाच राहिला आहे. अस जलसंपदा मंत्रालयाकडून इमेल आला आहे. पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल’. भाई शांत होते. जलसंपदा खात्याचे अधिकारी आशाळभूत चेहऱ्याने पुतण्याकडे पहात होते. थोडा वेळ पुतण्या शांत बसला. नंतर बोलला ‘मला माहिती होते असा निर्णय घ्यावा लागणार. आणि यावर मी विचार देखील केला आहे. आता कधी पासून पाणीकपात सुरु करायची याचा निर्णय फ़क़्त बाकी आहे’. सगळ्यांनी मान डोलावली. पुतण्याला एकदम शक्कल सुचली आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. भाईंनी पुतण्याला स्मितहास्य करतांना पाहताच ‘काय झाल?’ असा सवाल केला. पुतण्या हसत उत्तरला ‘पुढच्या आठवड्यापासून पाणीकपात सुरवात करा. म्हणजे अजून सहा दिवसांनी’. आयुक्त पुतण्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागले.

मग पुतण्या आयुक्तांकडे पाहून ‘त्याच दिवशी मी अस का म्हणालो तुम्ही समजून जाल’. तरीही सगळे गोंधळलेले. पुतण्या भानामतीला निघाला. जातांना मग भाईकडे बघून ‘दादांची वाढदिवसाची भेट समजा’. कोणालाच काही समजले नाही. पण वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल ‘दादा’चा परिणाम…


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.