ध्येय काय?


आपले नेमके ध्येय काय?  बऱ्याच दिवसांनी प्रयत्न करतो आहे. समजूत घ्याल अशी अपेक्षा करतो! बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ आहे. कशासाठी आपण मराठी मराठी करत आहोत. व नेमकं कशासाठी आपण ह्या गोष्टींवर इतका वेळ खर्च करत आहोत! 

मूळ प्रश्न असा आहे की नोकऱ्याच्या संधी कमी झाल्यात! रोजगार काय करावा हा प्रश्न उभा राहिला आहे! सरकारकडून काही अपेक्षा ठेवणं मूर्खपणा आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अडचणी नव्हत्या असं नव्हतं! पण सध्याला मराठीला आव्हान वाढलेली आहेत! आपण नेमकं करायचं काय हा प्रश्न उभा राहतो आहे. बरं कोणी काही करतोय म्हटलं की मदतपेक्षा अवहेलना जास्त प्रमाणात होते आहे.  त्यामुळेच आपलं नेमकं ध्येय काय असा प्रश्न स्वाभाविक आहे. मराठी वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत! यात आपल्याला जो पटतो तो घेऊन पुढे जाणे योग्य असे मला वाटते! कोणतीही सुरवात टीकाकारांच्या कृपेने खडतरच होते. काही असंतुष्ट असतातच! मग तुम्ही कोणताही मार्ग निवडला तरीही ही परिस्थिती अशीच आहे.

आपले ध्येय मराठी वाढवणे आहे! इतरांना नामोहरम करून आसुरी आनंद उपभोगणे नाही. रस्त्यात खाचखळगे असतातच! कधीकधी खिळे आणि खड्डेसुद्धा! त्यामुळे ध्येयाशी प्रामाणिक राहून कामाला लागूया! #जयमहाराष्ट्र


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.