‘न’कला


‘न’कला. आज दुपारी एका चित्रकलेच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो. तिथल्या एका कोर्सला अडमिशन घ्यायचे ठरवले आहे. एकतर माझ्यात नाही कला! नुसत्याच ‘न’कला. बर, मी जे काम करतो. हे खर तर आर्टिस्ट लोकांनी करावयाची कामे. मी त्यात घुसखोरी केली आहे. वेब डिझायनिंगसाठी किंवा कुठल्याही ‘डिझायनिंग’साठी ‘डिझाईन’ बॅकग्राउंड असलेला हवा असतो. माझ तसं काहीच नाही. बर मी जे कोडींग करतो, त्यातही ‘घुसखोरीच’. त्यामुळे फार दिवस घुसखोर म्हणून राहायचे नाही. एक चित्रकलेचा तीन महिन्याचा बेसिक कोर्स करतो आहे. शाळेत जेवढी चित्र-विचित्र काढली तेवढीच! आणि त्यानंतर साधी पेन्सिल देखील हाती घेतली नाही.

त्या कोर्समुळे थोडा हात साफ होईल. त्यानंतर बीएफए करायचा विचार आहे. म्हणजे मला चित्रच काढता येत नाही अस नाही. पण ते संगणकावर. अस हाताने नाही. मी अगदी सुरवातीला एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब केलेला. कंपनीने काय काम दिलेलं तर ‘इलस्ट्रेशन’ करायचे. फार काही भारी वगैरे समजू नका. थोडक्यात, चित्र पुन्हा रीड्रो करायचे. एक अडोब फ्ल्याश नावच एक सॉफ्टवेअर आहे. त्यात काम असायचे. माझ्यासोबत ते जीडी आर्ट केलेले. बिचारे, फोटो पाहून हाताने चित्र काढायचे. नंतर ते स्कॅन करून त्यावर रंग भरत बसायचे. कारण, चित्राचे सगळे भाग सुटे हवे असा नियम होता. दिवसाला चार चित्र दिली असायची. बिचार्यांना एका चित्राला दोन- अडीच तास वेळ लागायचा. आणि मला सगळे चित्र काढायला दोन अडीच तास. बर ती एवढी मोठी कंपनी. पण काम ‘पिल्लू’. आता संगणक असल्यावर काय अडचण?

त्या सॉफ्टवेअरची ती कमाल होती. मी चित्र जसेच्या तसे गिरवायचो आणि फोटोतील रंग पिक आणि ड्रॉप करायचो. असो, नंतर मी जाम बोर झालेलो त्या कामाला. डोक वापरायचे ते काम नव्हते. असो, बेसिकमध्ये माझी एकही गोष्ट क्लीअर नाही. त्यामुळे निदान काहीतर येत अस म्हणायला हव ना! त्यामुळे! तसं माझ बीसीए सुरु आहे. पाहूयात, यावेळी काय दिवे लागणार ते! काहीतरी कला अंगी असायला हवी अस वडील नेहमी म्हणतात.

आठल्ये घराण्यात मी सोडून सर्वांकडे काही ना काही कला आहे. जाऊ द्या! माझी ‘स्तुती’ मी कशाला करू. जाम बोर झालो आहे. एकतर! नाही नको. पुन्हा तो विषय नको. माझ मन मूर्ख आहे. खूपच चीडचीड होत आहे. नंतरच बोलू!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.