नगरचे रस्त्यातले खड्डे


परवा मी आमच्या गणेश मंदिरातील दर वर्षी होणारा भंडारासाठी गावी गेलो. माझ गाव वांबोरी. वांबोरी नगर पासून पुढे २५ किलोमीटर. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवाजीनगर हुन नगर बस पकडली. त्याच बस मध्ये माझा एक जुना मित्र भेटला. त्याच्या म्हणण्यावरून मी रांजणगावचे तिकीट काढले. तो म्हणाला कि रांजणगावपासून आपण दुचाकीवरून जावू. खर तर मला निघायला खूप उशीर झाला होता. म्हटलं कि दुचाकीवरून लवकर पोहचू. म्हणून मी त्याला हो म्हटलं. पण नशिबात काही लवकर पोहचण नव्हत. त्याचा मित्र भेटला. मग त्याच्या पुढे आम्ही निघून नगरला पोहचेपर्यंत दोन वाजून गेले.

या आधी मी दुचाकीवरून राहुरी पुणे असा दुचाकी प्रवास माझ्या मित्राबरोबर जवळपास दहा वर्षापूर्वी केला होता. त्यावेळी तर नगर मनमाड महामार्ग आणि नगर पुणे महामार्ग यांची फारच दुरवस्था होती. आमची दुचाकी दिल्लीगेट मार्गे मनमाड हायवे ने निघाली. नगरला रस्तेच नाहीत, हे मला आधी पासून माहिती होत. गाडी कशी बशी महामार्गाला लागली. आणि काय दोन किलोमीटर मध्ये आमच्या दुचाकीचा क्लच वायर तुटली. ती नीट केली तर पुढे गाडीला वेग घेता येईना. महामार्ग असून देखील १-१ फुटाचे खड्डे. अस वाटत होत मी भूतकाळ बघत आहे. काहीच फरक नाही. जे मी आधीच्या प्रवासात पहिले होते अगदी जसेच्या तसे. त्यावेळी नुकतेच काम सुरु झाले होते. परवा देखील काम जसेच्या तसे. अर्धा रस्ता अर्धवट कामाचा आणि उरलेला अर्धा या खड्यांचा. कसली कामे हि सरकारची. दहा वर्षापूर्वीची कामे अजून देखील जशीच्या तशी.

अस वाटत होत कि शिवकाळात किल्यावर जाताना खंदक असतात ना, तस आम्ही कुठल्या तरी गडावर चाललेलो आहोत. आणि हि दर फुटला येणारी फुटभर खन्दके. त्यात ना वृक्षारोपण छान होईल. जम वैताग आला. मागे बसून बसून पाठीचा पार चुरा झाला. मधेच पाऊस पडून गेल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. आणि ते खड्डे भरलेले होते. त्यामुळे रस्ता कोणता आणि खड्डा कोणता हे समजण्याचा काही मार्गच नव्हता. बर रस्ता निम्माच असल्याने, वाहतूक जाम. काय करावे काही सुचत नव्हते. मला वाटत कि आम्ही २-२:३० च्या सुमारास दिल्लीगेट ला होतो. तिथून वांबोरी फार फार तर अर्धा पाऊन तासाच अंतर. पण मला घरी पोचायला ४:३० झाले. घरी पोहचे पर्यंत भंडार्याचा कार्यक्रम संपला होता. माझे वडील जाम वैतागले होते. माझ्याशी काही बोलले नाही. पण त्यांना राग आला हे मात्र नक्की. आता यात चुकी माझीच म्हणावी लागेल. आपला देश मला नाही वाटत काही महासत्ता वगैरे होईल. आता आपण पुणे-मुंबई मध्ये राहतो. त्यामुळे इथ काही नवीन घडल तर आपल्याला आनंद होतो. पण बाहेर काय घडतंय हे ज्यावेळी आपण प्रत्यक्षात पाहिलं तर मग वस्तुस्थितीची जाणीव होते. गेल्यावर नेहमीप्रमाणे वीज मावशी नव्हत्या. येताना मात्र मी बस ने आलो. बस ने येताना आणि दुचाकीवरून येताना फरक पडतो. रस्त्याचा आणि आपला यात फार अंतर असते. आणि त्यामुळे रस्ता किती चांगला आणि किती खराब याचे मोजमाप करणे अवघड. त्यामुळे परत मला मनस्ताप होवू नये म्हणून मी बस ने आलो. नगरमध्ये आणि गावात या दोन्ही ठिकाणी काहीच नवीन नाही. मला खर तर प्रश्न पडतो कि नगर मध्ये ना नोकर्या, ना धंदे. मग इथली लोक जगतात कशी? नगरमधील रस्ते कधी होतील देव जाणे. आणि खर तर नगरला नगर हे नाव शोभत नाही. नगर या शब्दाचा अर्थ शहर. आणि हे नगर खेड् म्हणायच्या देखील लायकीचे नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.