नवीनपणा काहीच नाही


मागील काही दिवसांपासून नवीन काही घडतच नाही आहे. तीच सकाळ, तीच लोकल, तीच कंपनी, तेच काम. सगळ्या गोष्टीत तोच तोचपणा आलेला आहे. काही नवीन घडतच नाही आहे. दिवसाचा एक असा ठरलेला दिनक्रम (साचा) बनून गेला आहे. लोकल – कंपनी – घर. बस हेच सगळ. वर्तमानपत्रात त्याच त्याच बातम्या. कंपनीत येताना आणि घरी जाताना नेहमी मी काही तरी नवीन घडल अशी अपेक्षा करतो. पण काही नवीन घडत नाही. सकाळी उठून आवरा, लोकल पकडा, कंपनीत जाऊन तेच काम करा. घरी येऊन तेच. वर्तमानपत्रात काही नवीन बातम्या नाही. टीव्हीचे कार्यक्रम तेच. वर्डप्रेसवर पण त्याच पद्धतीच्या नोंदी. बर ज्यांच्या बोलण्याने पान देखील हलत नाही. अशी लोक देशपातळीच्या विषयावर आपली मत मांडतात. राष्ट्रीय नेते मूर्ख म्हणतात.

खर तर हे दररोज तेच तेच. त्यामुळे कंटाळा आला आहे. आपण कोणाला मूर्ख बनवतो ह्याचा कोणी विचारच करत नाही. सिनिअरच्या चुका, कंपनीच्या तेच तेच कामाचा आणि लोकलच्या नेहमी उशिरा येण्याच्या गोष्टीत काही खंडच घडत नाही आहे. कधी कधी मलाच मी मूर्ख असल्याचा भास होतो. दोन दिवस खर्च करून केलेलं काम सिनिअर नको म्हणतो. मग त्या कामाचा,आणि गेलेल्या वेळेचा काय उपयोग हेच कळत नाही. विषयाची माहिती नसताना त्याच्यावर लिहिलेले लेख वाचून आणि त्यावर आपले मत मांडून काय उपयोग? टीव्हीवर तर काही बोलू नका. कोणत्याही विषयावर कसले बिनडोक लोक पकडून चर्चा करतात. आणि ते त्याचं अर्थहीन मत सांगतात. दुसऱ्याने काय आणि कस केल पाहिजे हे त्यांना माहिती, पण स्वत काहीच करणार नाही. स्वाइन फ्लूच्या नावाखाली पुण्यात तर अनेकांनी त्यांची चांदी करून घेतली आहे.

विजेचा पत्ताच नाही आणि आपण कसे विकसित होत आहोत. किती पुढे गेलो आहोत याचे गुऱ्हाळ चालू आहे. अफझल खानच्या पुढे मान तुकवणारे पाकिस्तानातील सरकारने सईदची चौकशी केली पाहिजे यासाठी आटापिटा करतात. मुळात न् मला आता या रोजच्या त्याच त्याच गोष्टींचा आणि अखंडितपणे चालणाऱ्या फालतूगीरीचा कंटाळा आला आहे. ते काय बर, पाकने केलेला मुंबईवरील ‘भ्याड हल्ला’, मुळात ‘भ्याड हल्ला’ आपण कस म्हणू शकतो? त्यांचे दहा चौथी नापास पोरं येतात. आणि आपले दोनशे लोक मारतात. आणि आपण साधी हल्ल्याची धमकी सुद्धा देत नाही. आणि आपण त्यांना भ्याड म्हणतो. जाऊ द्या. कशाला त्याच त्याच जुन्या विषयावर आपला वेळ वाया घालवायचा. आपला देश आपला कशावरून हेच कळत नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.