नवीन कंपनी


नवीन कंपनी जॉईन करून तीन दिवस झाले. यार या मोठ्या कंपन्याचे हत्तीसारखे असते. नुसताच आकार भला मोठा. आणि यांचा कामाचा वेग म्हणजे हत्तीच्या शेपटीसारखे असते. उंदीर एवढ काम. आणि ते संपवायला हजारात फौज. तीन दिवसापासून माझा एम्पोई आयडी नाही. म्हणून कामाला अजून सुरवात झालेली नाही. अस वाटत आहे की कुठे ‘पिकनिक’ करायला आलोय. ही कंपनी माझ्या जुन्या कंपनीच्या मनुष्यबळाच्या ७०० पटीने आणि आकाराने वीस हजार पटीने मोठी आहे. पण कामाच्या बाबतीत शंभर पटीने मागे आहे.  असो, पण अजूनही घडणाऱ्या घटनांवर विश्वास बसत नाही आहे. पण कंपनी खूपच छान आहे. दुख एवढंच आहे की जुन्या कंपनीतील माझी आवडती मैत्रीण आणि माझे जुने सहकारी माझ्या सोबत नाही  आहेत. मी कंपनी सोडताना त्यांनी सगळ्यांनी मिळून मला एक खूप छान सदरा आणि एक खूपच छान काचेची गणेश मूर्ती दिली. बघून त्यांना सोडून जाऊच नये अस वाटत होत. विशेषत माझ्या मैत्रिणीचा स्वभाव. आता इथे सुद्धा माझी सिनिअर एक छानशी मुलगी आहे. बहुतेक माझ्या भाग्यात या सगळ्या ललना आहेत. पण फ़क़्त आहेत. माझी कोणीच नाही. सोडा तो विषय.

माझ्या मोठ्या बहिणीला माझे डेटा कार्ड दिले असल्याने मला माझ्या ब्लॉग वर येणे जमत नाही आहे. आत्ता सुद्धा या सायबर कॅफेत बसून बोलाव लागत आहे. एकवीस डिसेंबर नंतर ताईसाहेब मला ते डेटाकार्ड पुन्हा वापस करतील. मग बोलता येईल. बाकी जे घडत आहे, त्यावर एकाच म्हणाव वाटत आहे ‘स्वप्न’. ‘नवीन जॉब म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्या सारख असत. पहिले काही महिने रोमेंटिक असतात. नंतर संसार सुरु होतो. मग संसारातील रुसवे फुगवे सुरु होतात. मग नंतर नंतर वादावादी.’ अस माझ नाही माझ्या जुन्या कंपनीच्या बॉसच मत आहे. त्याने मी ती कंपनी जॉईन करण्याच्या वेळी सांगितलं होत. खर आहे. चला या कॅफेतील माझा तास संपत आला आहे. तुम्हाला जास्त पकवत नाही. माझ्या डाव्या बाजूच्या संगणकावर बसलेली नुसते मेल चेक करत बसली आहे. असो, थोडी अवघडल्याप्रमाणे वागत आहे. असो, मला काय तीचे.  नंतर बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.