नशीब


नशीब! ते म्हणतात ना ‘नशिबच गांडू तर काय करील पांडू’ तस झाल आहे अगदी! गेल्या दोन तीन महिन्यांपासून हे चालू आहे. मी जी गोष्ट करायला जातो ती होते, पण ताबडतोप किंवा एका झटक्यात होत नाही. म्हणजे ही अशी पहिलीच वेळ आहे. याआधी अस कधी घडल नव्हते. म्हणजे कंपन्या माझा इंटरव्यू घ्यायच्या आणि इंटरव्यू व्यवस्थित व्हायचे. परंतु नंतर पुन्हा त्यांचा फोन येत नसायचा. मग महिन्यानंतर, फोन!

बर ते काय कमी होते, मोबाईल घेण्यासाठी दोन महिन्यात अनेकदा गेलो. एकदा वडील नको म्हणाले. नंतर गेलो तर मोबाईल स्टोअर वाल्याकडे तो पीस शिल्लक नव्हता. नंतर गेलो तर पीस मिळाला. पण माझा एटीएम चा पिन विसरला. मी दोन तीनदा प्रयत्न केला तर ते कार्डच लॉक झाल. त्यामुळे पैसे असून देखील मोबाईल खरेदी करता आली नाही. नंतर घर घेण्याच्या निर्णयामुळे मोबाईल घ्यायचे पुढे ढकलावे लागले. त्यानंतर माझा तो संगणक कोमात गेला. ऑपरेशनचा खर्च जास्त असल्याने तूर्तास तो, आहे तसाच आहे. काल बहिणाबाईची हा ‘नन्हा मुन्ना’ लॅपटॉप आणलाय.

यार, लॅपटॉप बंद असल्यापासून अपंगत्व आल्याप्रमाणे वाटते. मित्राच्या संगणकावर बसलो तर त्याचा संगणक व्हायरसमय. बर, अस एकदा नाही दोनदा! दोन मित्रांचे पीसी फॉर्मट करावे लागले. काय प्रेम करतात यार ते त्यांच्या संगणकावर? महान आहेत. काही काम करता आले नाही. बर, सायबर कॅफेत जाणे परवडत नाही. म्हणजे एकतर वेटिंग, आणि त्यात तिथले संगणक गंडलेले. बर, ही बहिणाबाई सुद्धा संगणकाकडे नीट लक्ष देत नाही. सोडा, काही दिवसांपासून अस जाम चीडचीड होते आहे. उन्हात जसे होते ना तसे! त्यात अप्सराच काय ती थंड वार्याची झुळूक! पण ती देखील सुट्टीवर. खूप बोर झाल आहे.

खुपच उदास! तिची इतकी आठवण येते आहे ना! कधी भेटतो अस झाल आहे. इतक्यांदा भास होतात ना! कधी वाटते ती माझ्यापासून दूर आहे. तर कधी माझ्या सोबतच आहे. सगळ्या मुलीत तिचाच भास. यार, टीव्हीवर लागलेल्या चित्रपटात देखील तीच असल्याचा भास होतो. नक्कीच वेडेपणाचे ‘दौरे’ येत आहेत. असो, ती बाईक फायनल करावी म्हटलं तर दोन दिवसात तीन शोरूम मध्ये गेलो. पण ती शोरूम बंद. कधी मला जायला उशीर तर कधी शोरूमच्या सुट्टीचा दिवस. बर शेवटी, ती हिरो होंडा पॅशन प्रो फिक्स केली. बुकिंग करावं म्हणून मागील बुधवारी, म्हणजे पंधरा डिसेंबरला गेलो. वडिलांना गाडी दाखवावी म्हणून, सोबत गेलो. नेहमी साडेसात पर्यंत उघडे असणारे शोरूम साडेसहाला बंद झालेलं.

मग तर त्यावेळी खरच खुपच मूड गेलेला. अरे! तिचा वाढदिवस देखील होता पंधरा डिसेंबरला! पण ती सुट्टीवर. तिला फोन नाहीतर निदान मेसेज करावा अस खूप वाटलेलं. माझ्या मित्रांनी खूप लेक्चर दिल या विषयावरून. पण नाही केला. एकतर आजकाल अस घडते आहे ना! त्यात तिला मी फोन करायचो आणि तिला ऑड वाटले तर? म्हणून. आणि ती मस्तपैकी तिच्या आई वडिलांसोबत असेल आणि मी फोन करून किंवा मेसेज टाकून डिस्टर्ब केल्याप्रमाणे होईल. असो, ती उद्या येईल त्यावेळी तिच्याशी बोलेल. बर ते बाईकचे शोरूम बंद पाहून खुपच बेकार वाटले. देव पण काय मस्त आहे. तिचा वाढदिवस माहिती नसतांना त्याच दिवशी गाडी बुक करण्याची बुद्धी देतो. आणि गेलो की शोरूम बंद.

वडिलांसमोर माझ्या डोळ्यात पाणी. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावले. पण त्यांना खर कारण काय सांगू, मला कोणत्या कारणाने दुख: झाले आहे ते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गाडी बुक झाली असती तर किती चांगल झाल असते. नंतर दुसऱ्या दिवशी जावून बुक केली. त्यात ती माझी कोकणातील लहान बहिण. तिला ना मेसेज पाठवायचे व्यसनच लागले आहे. रात्रभर मेसेज, झोपायची सोय नाही. दिवसाला वीस एक मेसेज, रोज हेच. यार, मी तिचा काही दोष नसतांना तिच्यावर सगळा राग काढला. तिला सारखे मेसेज पाठवायचे नाहीत म्हणून झापल. असो, हे गोडीत बोलून देखील जमले असते.

त्या गाडीला एक महिन्याची वेटिंग आहे. काल आई आणि वडील गावी गेले. खुपच कंटाळा आलेला. बहिणाबाईशी बोलल्यावर मस्त वाटलेलं. असो, कधी वाटत माझ आयुष्य खुपच ‘बोरिंग’. कधी बहिणाबाई, आई वडील पाहिल्यावर नशीबवान असल्याप्रमाणे वाटते. माझा नशीब, भविष्यावर फार काही विश्वास वगैरे नाही. पण दोन एक महिन्यापासून जे घडत गेले त्यामुळे वैताग आलेला..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.