नितेश राणे यांचा स्वाभिमान


२ ऑगस्टला पुण्यात स्वाभिमान संघटनेच्या ३१ शाखांचे उद्घाटन झाले. मी कुठे कधी उद्घाटन झाले हे मला कळले  नाही. पण ठिकठिकाणी लावलेली भित्तिपत्रके बघून समजले. आज माझा बोपोडी मधील मित्र सांगत होता की आमच्या इथे नितेश राणे आला होता. तो म्हणाला त्याचा आवाज, बोलण्याची पद्धत अगदी नारायण राणे सारखी आहे. नितेश राणे काय म्हटला अस मी माझ्या मित्राला विचारल तर तो बोलला की ‘तुम्ही कोठेही आणि काहीही करा तुमच्यावर केस होणार नाही’.

बघना आपल्या राज्यात किती आणि कशा प्रकारे स्वातंत्र्य आहे. हेच इतर कोणी म्हटल असते तर त्याच्यावर कोणते कोणते कलम लावले गेले असते. पण हेही खर आहे की तो जे बोलला ते खर आहे. कारण मध्यंतरी मुंबईत त्यानी जो धुडगूस घातल्यावर कुठे काय झाल. बिचारे मुंबईकर नाहक त्रास सोसतात. त्यावेळी त्यानी काही मराठी मुलांची डोकी फोडली. मला खर तर स्वाभिमान आणि नारायण राणे याचा काय संबंध हेच कळत नाही. कधी ते म्हणतात की शिवसेनेने त्यांचा स्वाभिमान दुखावला. कधी ते बोलतात कोंग्रेसने त्यांचा स्वाभिमान दुखावला. मुळत हा स्वाभिमान काय आहे? म्हणजे स्वाभिमान प्रत्येकाला असतो. मलाही आहे. पण मी काही माझ्या स्वाभिमान आहे म्हणुन कोणत्या पक्षाला नावे ठेवत बसत नाही, नाही मी कोणाचे डोके फोडतो. स्वाभिमान असा असावा की जो बघून इतर आपल्याला मान देतील. बर ते सोडा, संघटना तर स्थापन झाली. ३१ शाखा काही ना काही तरी करतील. अस मानुया.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.