नियमितपणे अनियमित येणारी पुण्याची लोकल


आजकाल घड्याळ वापरणे रेल्वे खात्याने पूर्णपणे बंद केले आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. रोज मी ८:२१ ची लोकल पकडतो. पण मला काही कधी मागच्या एका वर्षात अस दिसल नाही की लोकल बरोबर ८:२१ ला आली किंवा निघाली. आजचेच उदहारण घ्या. आज मी संध्याकाळी ७ च्या लोनावाला लोकल साठी पूणे स्टेशनवर ६:४० ला आलो. बघतो तर काय  गाड़ी १५ मिनिटे उशिरा येणार. ३५ मिनिटे करायचे काय म्हणुन आज पूणे स्टेशनलाच जेवण करुयात असा बेत आखला. जेवणही झाल.

पण गाड़ी काही आली नाही. कालही असाच झाला पहिल्यांदी घोषणा केली की लोकल अर्ध तास उशिरा येइल म्हणुन प्रत्यक्षात आली ७: ४० ला खडकीला जायला साधारणत: १० मिनिटे लागतात. गाड़ी पोहोचली ७:५५ ला मग झाल. सिग्नलाच नाही. मोटारमनला विचारल  की तो सांगतो सिग्नल नाही. आणि स्टेशन मास्टर ला मराठी समजत नाही. हिंदीत विचारल की बोलतो क्रॉसिंग आहे. प्रत्येक रेल्वे खात्याताला माणुस आपला जणू काही यात संबंध नाही असेच दाखवतो. काल झाल ते झाल. आज पुन्हा तेच. पहिल्यांदी अस दाखवल की ७ वाजताची  पूणे लोनावाला लोकल १५ मिनिटे उशिरा सुटेल. ७:१५ ला पुन्हा घोषणा की लोकल ७:३० ला सुटेल. मग काय प्रवासी चिडले. अरे चिडले याचा अर्थ मुंबई प्रमाणे घेऊ नका. तिथे तोड़फोड़ होते. इथे फक्त गप्पा.  पण आज काही लोक स्टेशन मास्टर कड़े गेले. २०- २५ जन असतील. मग हो नाही करता त्या भैय्या स्टेशन मास्टर ने तक्रार घेतली. पण मी मागच्या १ वर्षापासून बघत आहे. अशा तक्रारीचा या परप्रांतीय वराहावर काही परिणाम होत नाही. गाड़ी आली ७:३० ला पण निघाली ७:४० ला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.