निराशाच


निराशाच! सगळ् अस घडतं आहे ना. बरोबर असून चूक. मी जी गोष्ट आजकाल करतो. म्हणजे योग्य करून देखील चुकते. म्हणजे का चुकते हेच समजत नाही आहे. खुपंच बेकार वाटत आहे. सगळीकडे निराशाच! आता वेळ जवळ जवळ संपल्यात जमा आहे. मोजून एक महिना. मागील एका महिन्यात सहा ठिकाणी इंटरव्यू दिले. तीन इंटरव्ह्यू मध्ये सपेशल तोंडावर पडलो. बाकी तीन इंटरव्ह्यू उत्तम गेले. पण काय फायदा. त्यातील एका कंपनीचा पुन्हा कॉल नाही. दुसऱ्या कंपनीचे अजून ऑफर लेटर आलेले नाही. आणि तिसऱ्या कंपनीने उदया अजून एक राउंडसाठी बोलावलं आहे. माझा हा प्रोजेक्ट ह्या माहिन्यात संपेल. निदान मला नवीन जॉबसाठी किमान एक महिना आधी नोटीस द्यावी लागेल. म्हणजे आज उदया मध्येच खेळ करवा लागेल.

पण व्यवस्थित इंटरव्ह्यू देऊन देखील अस घडतं आहे. जर या महिन्यात नाही जॉब शोधू शकलो तर, कंत्राट वाढवावे लागेल. आणि सगळेच होप संपल्यात जमा होतील. परीक्षेत देखील तेच झालं. नवीन घराचे सगळ् क्लिअर करून देखील तो बिल्डर काम पूर्ण करीत नाही आहे. मोबाईल घ्यायचा ठरवला. असो, हे चिल्लर काम देखील नाही होत माझ्याकडून. मुळात माझा आत्मविश्वास डळमळतो आहे. सगळी धडपड करून देखील, शेवटी हातात काहीच लागत नाही आहे. दिवस येतो आणि जातो. ना तिच्याशी बोलता येत आहे. मुळात सगळ् असून काहीच नाही अस होते आहे. मग हे विचार, खरंच मी तीच्या काहीच लायकीचा नाही. जो तो माझी या विषयावरून सोलतो. माझी चेष्टा केलेली, मला आवडत नाही अस काही नाही. पण खूप बेकार वाटते. सगळ् शून्य! मी दाखवत नाही परंतु मनात तीच्यापासून दूर जातो आहे अस कायम वाटते.

चार महिन्यात मी काहीच नाही करू शकलो. साधे ती माझाशी स्वतःहून बोलेल इतके देखील करू शकलो नाही. मी खरंच काहीच नाही. काही करूही शकत नाही. प्रेम वगैरे गोष्टी माझ्याकडून.. मला नाही माहित अस का होते आहे. ज्या गोष्टी एकदम शुल्लक वाटतात त्याच माझ्यासाठी खुपंच अवघड वाटत आहे. ती खूप छान! पण तिलाच मी सर्वात जास्त घाबरतो. तिचाच दिवसभर विचार करतो. तीच्या डेस्ककडे काही हालचाल झाली की, मी तिकडे पाहतो. पण तिच्याशीच नजर मिळवायची टाळतो. बोलावं खूप वाटून देखील मी.. नाही होत काही माझ्याकडून. जगणंच मुश्कील वाटत आहे. ती एक मुलगीच आहे. पण यार, मला नाही सुचत. मी ती सोडून दुसरा विचारच करू शकत नाही आहे. आता हे डोक ना जाम झालं आहे. काय करायचे कळून देखील, ही कोंडी फुटत नाही आहे. नंतर बोललेलंच योग्य होईल. पण इतके नक्की की मी जे करायचे ते स्वतः करील. इमेल, मेसेज, फोन किंवा ब्लॉगची मदत घेणार नाही. जे काय करायचे ते प्रत्यक्ष आणि मी स्वतः. जे होईल ते होईल. पण हे अस घडतं आहे नां! असो, नंतरच बोलू.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.