नेट आहे तुजपाशी


काल कंपनीत काम करत असताना खूप अडचणी आल्या. एक तर दोन महिने काही काम दिल नाही. आणि आता दिल तर ते ताबडतोप हव. आता नुसत बसून राहिल्याने माझ्या कामाचा वेग कमी झाला आहे. मग त्यात एखादी नवीन गोष्ट आली की माझी गोची होऊन जायची. मग काय नेट जिंदाबाद. थोड फार शोधल की अडलेल काम कस करायचं याची सगळी माहिती यायची. त्यामुळे दिवसभर शोध मोहीम आणि काम मस्त झाल. आणि अनेक नवीन गोष्टी समजल्या. संध्याकाळी घरी आल्यावर इंग्लिश स्पिकिंगाची काही माहिती घ्यावी म्हणून संगणकावर बसलो. तर वर्षभर पुरतील एवढी माहिती. आता काय गरज आहे ‘इंग्लिश स्पिकिंग’ क्लासची? आणि सराव करायचा झाला तर आहेच ना ‘कस्टमर केअरवाले’. अजून काय हव आहे? फक्त सुरवात करायची गरज आहे. कुठेही जाऊन पैसे खर्च करायची गरज नाही.

घरी येतांना ‘चिल्लर’ पार्टीचा क्रिकेटचा खेळ चालू होता. सगळी दीड फुटापेक्षा उंचीने जास्त नसतील. रस्त्यात त्यांच्या खेळ चालू. मला पाहिल्यावर त्यातली एक कार्टून मोठ्याने त्या तीच्या मित्रांना ओरडली ‘थांबा’. ‘थांबा’ म्हटल्यावर सगळे थांबले. सगळी एवढी गोड होती ती. मी पुढे निघाल्यावर त्यांचा खेळ पुन्हा चालू झाला. रोज असे चिल्लर बघितले की मराठीची पुढची पिढी आहे अस पाहून मन आनंदी होत. मागील आठवड्यात देखील असंच मैदानात काही मुल खेळत होती. मी आपला रस्त्याने घरी येत होतो. एका चेंडूला त्यातल्या पहिल्या चेंडूला चौकार. मग फलंदाजी करणारी टीम उड्या मारायला लागली. आणि त्याच्या पुढच्या चेंडूला तो फलंदाज झेलबाद झाला. किती छान. सगळेच हसत होते. त्यांना बघून मलाही हसू येत होत.

रात्री ‘माहितीचा अधिकार’ची वेबसाईट बघत होतो. ती पण देवनागरीत नीट दिसत नाही. पण भारताची वेबसाईट देवनागरीत नीट दिसती. म्हटलं आज माहिती अधिकाराच्या कार्यालयात जायचं आहे. तर निदान थोड फार तरी माहिती असायला हवी ना. महानगरपालिकेत देखील जावून जमल तर तो ‘मराठीत’ वेबसाईट नीट दिसत नाहीची तक्रार आयुक्तांकडेच द्यावी. नाही तरी त्या संगणक खात्याला मेल चेक करता येत नाहीत बहुतेक. पण काही हरकत नाही. येत नसेल, टाळत असतील. किंवा त्यांना काम ठीक होत नसतील तर कोणी तरी हवंच ना त्यांना त्रास द्यायला. काल म्हटलं एवढी चर्चा चालू आहे त्या ‘अर्थ संकल्पावर’. त्याची माहिती घ्यावी. थोड शोधल तर पंतप्रधानांच्या वेबसाईटवर मिळाला. आता ते नेमके काय आहे हे मी भारत सरकारच्या साईटवर जावून त्याचा सर्वे पहिला. किती आहे ना आपल्याकडे. इच्छा आणायचा उशीर. ते म्हणतात ना ‘तुझ आहे तुजपाशी’ तसचं शोधलं तर ‘सर्व आहे तुजपाशी’. रात्री एक चित्रपट देखील पहिला. माझ्याकडील सगळे चित्रपट पाहून संपले. मग युट्युबवर एक चित्रपट बघितला. कालचा दिवस धमाल गेला. फक्त ती संध्याकाळ थोडी.. ते परवाचे पात्र पुन्हा भेटले. आणि मला जबरदस्ती त्या कोणत्या तरी महाराजांचे प्रवचन त्याच्या एमपीथ्रीमध्ये ऐकावे लागले. मला उद्या त्याच्या त्या ‘इस्कॉन’ मंदिरात ये म्हणाला. मी पण आपल ‘हो’ ‘हो’ केल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.