नोकरी


परवा माझ्या एका मित्राचा दोन वर्षांनी फोन आला होता. मला म्हणाला ‘मी आता बी.सी.ए च्या तिसऱ्या वर्षाला आहे. यापुढे एम.सी.ए करायचे म्हणतो आहे. तर मग मला नोकरीसाठी काही अडचण येणार नाही ना?’ मी  ‘नाही’ येणार अस म्हणून फोन ठेवला. काल संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा की माझ्या एक मित्र तिला भेटला होता. तर ती मला सांगत होती ‘तो खूप टेन्शनमध्ये होता. त्याला तू काय झाल विचार’. मी ‘हो’ म्हणू फोन ठेवला आणि त्या माझ्या मित्राला फोन केला. त्याला विचारलं काय झाल तर तोही नोकरीच्या शोधात होता. आता तो शोधात आहे हे माहिती होत पण सहा महिन्यात एक कंपनी भेटू नये? त्याला विचारलं अडचण काय आहे तर बोलला की माझी कंपनी सहा महिन्यापूर्वी बंद पडली. आता कुठेही मुलाखत दिली तरी देखील कुठे नोकरी मिळत नाही आहे. नीट बोलल्यावर त्याच्या इंग्लिशची अडचण लक्षात आली. येत असून देखील ते दाखवता येत नाही. पुढच्या आठवड्यात आम्ही भेटणार आहोत.

माझ्या जुन्या कंपनीत भरती आहे का ते पहावे लागेल. याच महिन्यात माझ्या आणखीन एका मित्राची कंपनी बंद झाली. हे सगळे अशा कंपन्या का शोधात की ज्या जास्त काळ चालत नाही? असो, त्याचा एकूण अनुभव आणि कामाचे कौशल्य पाहून कदाचित त्याला माझ्या जुन्या कंपनीत नोकरी मिळायला हवी. कालच आमच्या कंपनीत नोकरीच्या संधी आहेत अस कळल. आता वेब डेव्हलपर हवे आहेत. २-३ वर्षांचा अनुभव असायला हवा. माझ्या पहिल्या मित्राचा अनुभव फ़क़्त सहा महिन्याचा आहे. आणि दुसऱ्या मित्राचा तीन वर्षांचा आहे पण त्याकडे अनुभवाचा कोणताच पुरावा नाही. आता या आधी माझ्या दुसऱ्या मित्राला मी ज्या वेळी माझ्या जुन्या कंपनीत त्यावेळी माझ्या बॉसशी बोलून त्याला मुलाखतीसाठी बोलावले होते. पण साहेबांना वेळ नव्हता त्यावेळी. त्यावेळच्या ‘ह्या‘ अनुभवानंतर मी मित्रांना नोकरीसाठी मदत करायचं बंद केल होत. आता त्याला पुन्हा नोकरीची गरज आहे. असो, मित्र म्हणून मदत करील.

पण एक गोष्ट सारखी खटकते आहे की प्रत्येक वेळेस ह्या माझ्या मित्रांनाच त्यांच्या अडचणीच्या वेळी कायम मीच फोन का करायचा? गरज त्यांना, अडचण त्यांना आणि फोन करून मुलाखतीला जा म्हणून म्हणायाचे मी. तो गावाचा माझा एक मित्र असाच. सहा महिन्यापूर्वीची गोष्ट. माझा मोबाईल नंबर घेतला. आणि त्याचाही दिला. मला म्हटला ‘माझ्या कलेची कुठे तुला नोकरी आहे अस समजल तर मला कळव. तस मी तुला फोन अधून मधून करत  जाईल’. अजून त्याचा फोन आलेला नाही. आणि हे दोघेही असेच. नेहमी मीच त्यांना फोन करायचा. यांचे फोन कधी येणार नाहीच. आला तर मिस कॉल. काय बोलाव. माझी खरच मनापासून इच्छा आहे. मी ज्या ‘वेब’ क्षेत्रात आहे. यात मराठी माणसांच वर्चस्व असाव. पण हे सगळे असे. जर तुम्हाला ‘वेब डेव्हलपर’ ची नोकरीची गरज असेल तर मी तुम्हाला आमच्या कंपनीची असलेली ‘रिक्वायरमेंट’ कळवतो. किवा अजून कुठे कोणती रिक्वायरमेंट कळली तर मी नक्की सांगेन.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.