परीक्षांचा निकाल


दर वर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर ‘परीक्षांचा’ उन्हाळा सुरु होतो. या उन्हाळ्याच्या झळा जवळपास सर्वांनाच बसतात. छोट्या छोट्या बालांपासून ते त्यांच्या मोठ मोठ्या आई बाबांना. काहींच्या तर आजी आजोबांना देखील. जून महिन्यात मग सुरु होतो पावसाळा ‘परीक्षेच्या निकालांचा’. काहींचा पुरता ‘निकाल’ लागतो. काही हा पावसाळा आनंदाने साजरा करतात. परंतु, काही मात्र जाम ‘आजारी’ पडतात.

‘कमी’ नावाचा संसर्गामुळे अनेक जण हैराण होतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘कमी’ नावाच्या रोगाची साथ परीक्षेच्या निकालानंतर पसरते. आणि बहुतेक जण याचे ‘बळी’ ठरतात. आणि त्यानंतर लगेचच ‘एडमिशन’चा मृगजळाचा खेळ सुरु होतो. परीक्षेच्या निकालानंतर सर्वच ‘परीक्षार्थी'(विद्यार्थी नव्हे) शिक्षणाच्या वाळवंटात ‘एडमिशन’चे मृगजळ शोधू लागतात. कसेबसे कमी जास्त करीत एखाद्या ठिकाणी आपली जागा पक्की करतात. आणि मग पुन्हा परीक्षार्थी पुढच्या येणाऱ्या मोसमाची वाट पाहू लागतात. हा खेळ असाच वर्षानुवर्षे चालू आहे. आणि कदाचित पुढे चालू राहील. ध्येय ‘शिक्षण’ की ‘परीक्षेचा निकाल’? हेच न सुटणारे कोडे झाले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.