पाच


पाच ह्या अंक बद्दल बोलाव तेवढे कमीच आहे. आणि माझ्या बाबतीत बोललं तर सगळया गोष्टीत पाच आहेच. माझ्या जन्म दिनांकात देखील शेवटी पाच, ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना देखील पाच. जन्म वर्षातही शेवटी पाच. काय गम्मत आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकिटाच्या क्रमांकात देखील शेवटी पाच होते. आता काहीच घडवून आणलेलं नाही. माझा पहिला मोबाईल नंबरच्या शेवटी देखील पाच होते. सध्याला माझ्या वयाच्या शेवटी देखील पाच आहे. आणि सध्याला असलेले माझ्या वजनात देखील शेवटचा अंक पाच आहे.

सृष्टीतील देखील पाच तत्वे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांपासून शरीर तयार होते अस शास्त्र सांगते. या पंचतत्त्वांपैकी दोन – तीन तत्त्वे एकत्र येऊन वात, पित्त वा कफदोष तयार होतात. शरीर तयार होत असताना त्यातला जो वात दोष आहे, त्यामध्ये पाच प्रकारचे वात असतात, त्याला पंचप्राण म्हणतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे पंचप्राण असतात. हाताला आणि पायाला पाच बोटे असतात. पाच इंद्रिय असतात. त्वचा, नाक, कान, डोळे व जीभ. या इंद्रियांमुळे बाह्य जगाचे ज्ञान होते.  बापरे! पाच अंक वाढतच चालला आहे. अरे हो! पांडव देखील पाच होते. आफ्रिका, अमेरिका, ओशनिया, युरोप, आशिया असे पाच खंड आहेत. पाच महासत्ता आहेत. ओलंपिकच्या लोगोत देखील पाच गोल आहेत.

आपल्या हिंदू धर्मातही पंचकर्म नमूद केलेली आहेत. मुस्लीम लोक दिवसातून पाच वेळा नमाज करतात. शीख लोकांचा केश, कंघा, कारा, कच्च, कृपण असे पंचकार असतात.आपले सरकारही पेट्रोल दरवाढ पाचच्याच पटीत करत असते. अरे हो, सरकारचा कालावधी पाच वर्षांचा असतो. दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते लोकसभेच्या सभापती आणि खासदारापर्यंत सगळ्यांचा कालावधी पाच वर्षांचा असतो. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या १०५ वीरांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या संख्येत देखील शेवटी पाच आहे. सगळे बोलून झाले आणि आजचा दिवसाबद्दल बोलायचे राहूनच गेले. आज पंचवीस मे. म्हणजे आजच्या दिनांकात देखील शेवटी पाच. आणि महिन्यात देखील पाच.

आजच्याच दिवशी जॉर्डन, सुदान आणि अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन आहे. आणि याच दिवशी सुनील दत्त यांचे निधन झाले. या सर्व घटनात शेवटी पाच हा अंक आहे. असो, फार जास्त पकवत नाही. कारण मी रोज पाच वाजता उठण्याचा प्लान करतो. पण रोजचं फूस! निदान माझ्या जयंतीच्या वेळी तरी..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.