पाणी पाणी रे


चार दिवसांपूर्वी हीच वेळ पिंपरी-चिंचवडवर आली होती. दोन दिवस पाणीच आल नव्हत. आणि आजकाल दिवसातून चार तास वीज देखील नसते. काल म्हणे ‘जागतिक जल दिन’ होता. माझ्या गावी तीन दिवसाआड ‘जल तास’ असतो. पंधरा वर्षांपासूनचा हा चाललेला ‘जल’ तास.  आता पुण्यातही ‘जल’ तास होईल की काय भीती वाटते आहे. नेहमीचंच आहे म्हणा. या विषयात नाविन्य अस काही नाही. आता वर्तमानपत्र, मिडिया वाले. आपल्या जुने रेकोर्ड पुन्हा लावतील. आणि आमचे ‘दादा’ त्याच त्याच रटाळ सूचना करतील. पण शेवटी व्हायचं तेच होईल. त्यामुळे आत्ताच आपली काही तरी सोय बघितलेली बरी. उद्या पाणी नाही आल तर निदान अंघोळ बुडायला नको. अशी काही तरी सोय लावली म्हणजे झालं.

विषय गंभीर आहे. पण नेहमीचाच झाल्याने त्याबद्दल आपल थोड दुर्लक्ष झालं आहे. फार काही नाही. दोन दिवस पुरेल एवढा साठा करण्याची सोय करा म्हणजे झालं. म्हणजे माझ्या जुन्या कंपनीतील गत झाल्याप्रमाणे नको. तिथ विधी करायला देखील दिवस पाणी उरल नव्हत. गावी आठ दिवस दोन कुटुंब आरामात पाणी वापरातील एवढा साठा करून ठेवला आहे. आता तिथे हा प्रश्न बाराही महिने असल्याने ती सोय प्रत्येकाने केलेली आहे. तसे पाहायला गेल तर आपणच आपल्या घरचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहोत. त्यामुळे ही जबाबदारी आपली आहे. आपण अडचणीत येत काम नये म्हणजे झालं. बाकी आता रोजच ‘पाणी वाचवा’ असे उन्हाळ्यातले कोरडे उपदेश आणि प्रवचन सुरु होतील. प्रवचनकारांनी अजून आपल्या भवनाची पाणीपट्टी भरलेली नाही. आधी भवनात मासिक लाखो लिटर पाणी वाया जाते. त्याकडे प्रवचनकार लक्ष देणार नाही. त्यामुळे एखादी नवीन टाकी. किंवा तेवढी सोय होईल अशी एखादी संधी निर्माण केली म्हणजे पुढचा प्रश्न निर्माण होणार नाही. काल पिंपरी-चिंचवडकर होते. उद्या सगळे महाराष्ट्रकर हे भोगतील. आता हे शेंबड पोर देखील सांगेल. त्यामुळे थोडंस लक्ष घातलं तर आपण यातून सुटू. सध्याला माझ्या इथ एक दिवस पुरेल एवढा साठा आहे. अजून एक दिवसाची सोय मी ताबडतोप करीत आहे. म्हटलं ‘पाणी पाणी रे’ नको व्हायला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.