पाणी प्रश्न आणि उपाय


नमस्कार, ट्विटरसंमेलनमध्ये मत मांडण्यास संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून आभार मानतो. याच थ्रेडमध्ये ‘पाणी प्रश्न आणि उपाय’ या विषयावर मी माझे मत व्यक्त करतो!

खरं तर पाणीप्रश्न तसा आपल्यासाठी नवीन नाही. लहान मुळापासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत यावर अनेकदा चर्चा होतंच असते. खरं तर देशाची भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्याकडे निर्माण होणारा पाणीप्रश्न हा नैसर्गिक नाही.

पाणीप्रश्न निर्माण होतो. याची खरी करणे अपुरा पाऊस नाही. कदाचित पटणार नाही परंतु, दरवर्षी जेवढा पाऊस आपल्या देशात पडतो तेवढा जगाच्या पाठीवर कुठेच पडत नाही. त्यामुळे आपली खरी अडचण पाणी नियोजनाची आहे.

साधारण हजारपेक्षा जास्त लहान मोठी धरणे आपल्याकडे आहे. त्यात जेवढे पाणी जमा होते ते बारा महिने पुरेल इतके ते नसते. त्यामुळे वर्षातील चार महीने काही ठिकाणी यापेक्षा अधिक आपल्याला दुष्काळाच्या झळा पोहचाव्या लागतात.

सरकारी आकडेवारीनुसार देशातील ६८% भाग हा दुष्काळग्रस्त आहे. याउलट उत्तर पूर्वेत पुर परिस्थिती असते. तिथे इतका पाऊस पडतो की नद्यांना पूर येतो व गावच्या गाव वाहून जातात. बरं हे दरवर्षीचे आहे!

पाणी नसल्याने देशातील ७०% अधिक जमीन एकतर विनापाण्याची आहे. तर देशातील १% जमीन अतिपाण्याने नापीक झाली आहे. आपली खरी अडचण ही आहे पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसणे. आता मला सांगा, पाऊस पडल्यावर पुढे काय होत. आपल्यापैकी प्रत्येकजण हेच सांगतो की ते पाणी वाहून जाते. आणि हेच आपलं चुकते. आपण साठवण करीत नाहीत. वा तसा विचार देखील करीत नाही.

पुढे जाऊन ते पाणी नद्यावाटे समुद्रात जाते. जे काही धरणात जमा होते. त्या धरणांच्या क्षमतेमुळे आपल्याला बरेचसे पाणी सोडून द्यावे लागते. असेच आपण निम्म्याहून अधिक पाणी समुद्रात जाऊ देतो. आणि मग येरे माझ्या मागल्या प्रमाणे ते दुष्काळाच्या झळा सहन करतो.

पाण्याचा योग्य वापर म्हणावा. तर त्यातही आपला भोंगळ कारभार आहे. एकट्या पुण्यात ४०% पाणीगळती आहे. त्यामुळे आपण आहे त्या पाण्याचा नीट वापर करीत नाहीत. त्याची काळजी देखील घेत नाहीत. पाण्याला त्याचे महत्व देत नाहीत. इथूनच दुष्काळ व पाणीप्रश्न निर्माण होतो.

पाणीप्रश्न निर्माण होण्याच्या कारणांमध्ये आपण पहिले की साठवण क्षमता कमी व नियोजन नसल्याने आपण बरेसचे पाणी वाया घालवतो. जे पाणी लोकांपर्यंत पोहचते. त्यात आधी म्हटल्याप्रमाणे योग्य ते महत्व देत नसल्याने मग नासाडी होत राहते. मग पुढे अकल्पित प्रश्न उभे ठाकतात.

टँकर माफिया ही नवीन संकल्पना गेल्या दहा वर्षात उदयास आली आहे. हे गुन्हेगारीचे दुसरे नाव आहे. पाणी टंचाईमुळे गावागावात, तालुका व जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण होतात. अगदी एकमेकांची डोकी फोडण्यावर व न्यायालयात खटले दाखल होण्यापर्यंत वाद विकोपाला जातात.

यात चूक खरी तर कोणाचीच नसते. फक्त अपुरे पाणी असल्याने हे घडते. शेती वा अन्य बाबींचा विचार केला पाणीप्रश्न निर्माण झाला की अर्थचक्र थांबते. पाण्याअभावी अनंत अडचणी उभ्या ठाकतात.

मीच काय ट्विटरवरील अनेकजण गावाकडची परिस्थिती जाणतात. पाणीप्रश्न किती विषय गंभीर बनवतो हे आपण जाणतोच! यासाठी स्वातंत्र्याआधीपासून एक कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याची योजना आखली गेली. त्या योजनेचं नाव आहे ‘राष्ट्रीय नदी जोड’ प्रकल्प!

राज्य सरकारने व सामाजिक संस्था यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार सारखी संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबवली गेली आहे. याआधी देखील महाराष्ट्र सरकारने पाणी आडवा पाणी जिरवा सारख्या संकल्पना चांगल्या पद्धतीने राबवल्या आहेत.
गरज आहे ती केवळ योग्य नियोजनाची. नागपूर महानगरपालिकेने वर्षभरापूर्वीच अडीच लाख नळजोडण्या केल्या. जुन्या पाण्याच्या नलिका बदलून टाकल्या. पाणीगळती व पाण्याची बचतही झाली. अशा योजना जर देशपातळीवर राबवल्या गेल्या तर पाणीप्रश्न हाताळला जाऊ शकतो!
असेच काहीसे राजेंद्र सिंह यांनी राजस्थामध्ये अनेक मोठे बदल घडवून आणले. पाणी साठवले व योग्य वितरण व्यवस्था निर्माण केली तर देशातील अनेक प्रश्न योग्यपणे सुटू शकतील!
पाणी जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळे सरकारने पाणीप्रश्न समूळ नष्ट व्हावा यावर विचार आवश्यक आहे. जनतेने साथ दिली तर प्रश्न गतीने सुटू शकतो! आपण सर्वांनी वेळ दिलात यासाठी मी मनापासून आभारी आहे. आयोजकांचे सुद्धा आभार! माझे मनोगत पूर्ण करतो! जय महाराष्ट्र!

2 प्रतिसाद ते “पाणी प्रश्न आणि उपाय”

  1. सुंदर माहिती ,तुम्हाला जलसंपदामंत्री केल असत तर खरच महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सुटला असता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.