पी जे


एक महिन्यापासून रोज दर दहा मिनिटांनी ‘आप सुन रहें है पुणे का नंबर वन…’ ‘और मै हू..’. ऐकतो आहे. त्या एफ एम वर चांगली गाणी चालू असतात. आणि हे मधेच ‘बजाते रहो’ नाही तर ‘बल्ले बल्ले’ अस काहीस वाक्य घुसडतात. आणि गाण्याचा आस्वाद घेत असताना हे मधेच काही तरी पांचट जोक मारतात. हसू येण्याऐवजी राग येतो. त्यात तो ‘घंटा सिंग’. त्याच्या फोनपेक्षा मोबाईल कंपन्यांचे जाहिरात परवडली. इतकी तरी डोकेदुखी होत नाही. हे आर जे कुठून पकडून आणतात देव जाणे. मधेच मराठी आणि मधेच हिंदी. निदान एका भाषेत बोला. पण गाणी हिंदी. गाणे चालू असताना मधेच ‘हाये..’ आता हे काय? बर तो त्यांचा टाईमचेक पण अनेक वेळा चुकीचा. त्यात लवगुरु बद्दल काही विचारूच नका. सगळ्यांना एकच सल्ला ‘तिचा सरळ विचार, नाही म्हणाली तर दुसरी’. ‘क्या आप व्हर्जिन है? अगर हो तो मुझे कॉल करो और जितो..’ बर अस म्हणणारी एखादी मुलगी आर जे.

मध्यंतरी पुणे बॉम्ब स्फोटानंतर त्यांनी ते नवीनच ‘स्पिरीट ऑफ पुणे’ सुरु केल होत. कसलं ढेकळाच स्पिरीट. आमची लोक मारली गेली. आणि आम्हाला कोणी केल याचा साधा पत्ता देखील लागला नाही. शांत रहाण म्हणजे काय स्पिरीट असते. ते एटीएस वाले ‘तुम्हाला काही माहिती असल्यास आम्हाला कळवा’ असले पी जे मारतात. आणि पुण्याच्या महापौरांना ‘मराठी’ येत नाही बहुतेक. दिवसातून एक पीजे मारतातच. तिकडे ती सखी सहेली बरी म्हणावी तर इकडे मलिष्का लोकांना शेंडी लावत फिरते. आणि इकडे पूजाच्या ‘बॉलीवूडच्या थापा’ चालूच. ‘तुम्हाला गिफ्ट व्हाउचर हवी असतील तर मला कॉल करा’ जणू काही हा ‘कॉलबॉय’ आहे. बर गाणी आपली वाजवायची ना. ते राहिलं ‘तुमची किती अफेअर्स झाली आहेत’, ‘तुमच्या जीवनातील सर्वात वाईट दिवस कळवा’ आणि माझ्याकडून कपल्स पासेस घेऊन जा. बर त्यातलं एका एफ एम ने तर फारच डोक उठवलं. दोन तीन मराठी गाणी वाजवतात. आणि ते पण आता बंद करा अस त्यांच्या लाल बॉसने मुंबईवरून कळवल आहे. त्या लाल एफ एम चे कुळ शोधल तर समजलं की ते एफ एम दक्षिण भारतातलं आहे. शेवटी ‘सन’ असा पुण्यावर उलटणारच ना. या सगळ्या पी जे लोकांना दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टींमध्येच रस जास्त आहे. शेवटी वैतागून काल पासून ते रेडिओ वाजवणंच बंद केल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.