पुणेकरांचा संपर्क


काय बोलाव कळत नाही आहे. पुणेकर सगळे अगदी सारखेच कसे काय? माझा काका. माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो. पण मागील एका वर्षात मोजून तीनदा घरी आला. बर, फोन नावाचा काही प्रकारच नाही. कधीच स्वत:हून फोन करत नाही. आणि मी मुर्खासारखा दर शनिवार – रविवार पायपीट करत जातो. अधून मधून फोन मीच करायचा. माझी एक बहिण तिथेच रहाते. एका वर्षात दोनदा माझ्या घरी आली आहे. काय बोलाव. तीच ही तेच कधीच फोन करत नाही. कधीही बघा. मोबाईलमध्ये पैसेच नाही. अजून माझ्या दोन बहिणी, आमच्या बहिणाबाई चिंचवडमध्ये राहतात. त्या चाफेकर चौकापासून माझ घर दोन किमी अंतरावर आहे. बर त्या दोघींकडे गाड्या आहेत. दोघींकडे महिन्यातून एक माझीच चक्कर होते. त्या कधीच माझ्या घरी येत नाही.

तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या गावी हे सगळे फक्त एकदाच आलेले आहेत. माझी सर्वात जवळची मैत्रीण मूळची जळगावची आहे. म्हणजे हिचा जन्म पुण्यातला. तिला एकदा विचारले की, तू गावी कधी जातेस का? ती म्हणाली हो एकदा लहानपणी गेले होते. आणि आत्ता वडिलांच्या आग्रहावरून तीन दिवसांसाठी गेले होते. पुण्याच्या पाण्यात काय जादू आहे काही कळत नाही. पुणेकर कधी आपल घर सोडून आपल्या नातेवाईकांकडे जातच नाही. आणि फोन नावाचा प्रकार कधीच करत नाहीत. मित्र, मैत्रिणी असले की झालं. त्यांच्याशी दिवसरात्र गप्पा मारतील. पण नातेवाईक म्हटलं की काय होत देव जाणे. काही संपर्क ठेवण्याची रीतच नाही. त्या नातेवाईकांनाच जास्त गरज ह्या पुणेकरांची. बर, जाऊन देखील ह्यांचा पाहुणचार म्हणजे उपासच म्हणायचा. ह्या सगळ्या पुणेकरांकडे त्यांच्या मोबाईल फोन मध्ये कधीही पैसे का नसतात, काय कळत नाही. माझी मावशी. ती देखील तशीच. तिला ते स्वारगेट ते चिंचवड फार लांब आहे असे वाटते की काय? कधीच येत नाही. आणि आमच्या मातोश्री, मी लहान असतांना मला इच्छा नसतांना गावाकडून सुट्टीत इथ आणायच्या. बर सगळे टिपिकल. ‘जेवण झालंच असेल ना?’, जेवतांना ‘पोळी वाढू का?’. कुठल्याही गोष्टीत ‘का’ हा येणारच. नुसतं ‘हो’ कधीच म्हणत नाहीत. हो’का’ अस म्हणतात.

माझी औरंगाबादची आत्या, माझा दादा, माझी कोकणातील बहिण नेहमी संपर्कात असतात. आत्या दोन महिन्यातून एक भेट नक्की देते. दादा महिन्यातून किमान एक फोन तर नक्की करतो. लहान बहिण आठवड्यातून एकदा किमान दहा मिनिटे फोनवर गप्पा मारातेच. पण इथल्या पुणेकर जमाती बद्दल काय बोलाव. यांचा संपर्क, बापरे. आपणच फोन करायचा आणि हे आपल्यालाच म्हणणार ‘निघालास की मला कॉल कर’. नाहीतर चक्क मिस कॉल करणार. हे कसलं एकतर्फी प्रेम. नाहीतर कधी फोन केला की बिझी. मला दहा मिनिटांनी फोन करा असा उरफाटा सल्ला. निम्मावेळ तो फोन घेऊन हे झोपले असतात काय काही कळत नाही. माझा जिवलग मित्र. आता त्याला कुठल्या अंगाने जिवलग म्हणायचा हा प्रश्न आहे. दोन वर्षात एकही स्वत:हून फोन केलेला नाही. नेहमी काय आपण फोन करायचा? शेवटी वैतागून मी देखील त्याला फोन करणे बंद केल आहे. बर त्यांच्या आठवणी मलाच येतात. त्यांना का येत नाहीत देव जाणे. गरज ह्यांना, आणि आपण मदत करून ह्यांच्या प्रेमाची भाबडी आशा करायची. कंपनीतील पुणेकरबद्दल काही बोलून काही फायदा नाही. प्रत्येक जण साधी कधी ओळख देखील दाखवत नाही. दहा मिनिटांपूर्वी ज्याच्या सोबत काम केले. त्याच ते काम झालं की, तो तुमची ओळख विसरतो. जुन्या कंपनीबद्दल काही न बोललेले बरे. आणि बोलून तरी काय फायदा? सगळे पुणेकर इकडून तिकडून सारखेच. कोणी पाहुणा म्हणून घरी आला की बघा यांचे चेहेरे. सोडा पुणेकरांचा ‘संपर्क’ टाळलेलाच उत्तम. कारण शेवटी काहीही झालं तरी ‘पुणेकरच’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.