पुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता?


राज्यातील समीकरणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी सत्ता हेतूने फेबुर्वारी २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात असलेले कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिले. खर तर दादाना भाईना महानगरपालिकेतून बाहेर काढायचे होते. म्हणून हा सगळा खटाटोप. काल उद्धव ठाकरे यांनी तो मोडण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. तस पाहायला गेल तर ह्या पुणे पॅटर्न चा फायदा काहीच नव्हता. जो काही होता तो केवळ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला होता. आणि नुकसान जे काही झाले ते कॉंग्रेसला झाले. बाकी फेबुर्वारी २००७ पासून ते आता पर्यंत पुण्यात काही नवीन घडले नाही. जे काही थोडे फार झाले ते राष्ट्रीय स्पर्धेपुरती नाटके झाली. भिंती, रस्ते, बस रंगवल्या म्हणजे काही विकास झाला अस मला तरी वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. इथले सगळे पक्ष कितीही विकासाच्या गप्पा मारू दे. पण सगळ्यांना सत्ताच हवी आहे. आणि विकास नावाचा कोणी इथे आला नव्हता.

या मागच्या दोन वर्षात दादा आणि भाई लहान मुलासारखे भांडत होते. पाहायला गेल तर त्या दोघानाही इथ कोणीही विचारात नाही. पण दोघेही स्वतला काय समजतात कुणास ठाऊक?. मध्यंतरी राज ठाकरे नि परप्रांतीय लोकांविरोधात आंदोलन सुरु केले होते. आणि दादा कुठल्या तरी उद्घाटनाला वल्लभ नगरला आले होते. भाषणात दादा गरजले ‘राज ठाकरे नि माझ्या वाटेला जाऊ नये’. आता काय म्हणाव या दादाला. मला हे कळत नाही दादा स्वताला पुण्याचा दादला असल्यासारखे का वागतो. बर उदघाटन आणि राजचा काय संबंध? बर मला नाही वाटत, दादाच्या वाटेला जायचा कोणी मूर्खपणा करेल. बाकी काय उरला तो पुणे पॅटर्न. त्याच्या बद्दल काय बोलाव? त्यात काही पुणेकरांसाठी काही नव्हताच. पण एक मात्र घडल या दोन वर्षात. महानगरपालिकेत बंदुका घेवून जाण्याची प्रथा मात्र पडली.

आणि हो, ते धमकावण्याचे प्रकरण तर मी विसरलोच. पुण्यातील कुलोत्पन (कारण त्यांनी लोकांची कुलच कुल घराबाहेर काढली) मानकर साहेब यांनी पुण्याचे नाव चांगलेच गाजवले. मुळात पुणे पॅटर्न बद्दल मलाच काय पण कोणत्याही पुणेकराला काहीच वाटले नव्हते. जे काही वाटले ते त्या मिडियाला. त्यांना एक काम धंदे नसतात. कोणती बातमी किती प्रमाणात द्यावी याचा तर त्यांना कोणी जाबच विचारात नाही. हे ‘पुणे पॅटर्न’ नावाचे नामकरण त्यांनीच केले. तो एक आहे ना लातूर पॅटर्न, तसा इथे पुणे पॅटर्न. आता या बैलांना कशाला काय नाव द्यावे हे देखील कळत नाही. अरे विसरलोच. या मिडियावाल्यांचा राष्ट्रीय उत्सव आहे कि आज (बैल पोळा). मग काय आज बाकी अब तक, बिंदिया टीवी वाले फुगे लावून फ़िरतिलच. आज बाकी त्यांना काही म्हणायचं नाही बुवा. पुणे पॅटर्न आणि लातूर पॅटर्न यात फार फरक आहे. तो कसा हे तुम्ही चांगलेच जाणता. मी तरी बाकी या तीन माकडाना परत चुकूनही मतदान करणार नाही. नाही तरी मतदान केल तर उद्या हि पुणे पॅटर्न पार्ट २ काढतील. मग कशाला असला दादला हवा आहे पुण्याला. ते एक गाणे आहे ना ‘असला दादला नको ग बाई ‘


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.