पुण्यातील स्वाइन फ्लू


स्वाइन फ्लू ने पूणेकरांची झोपच उडवली आहे. सिंबायोसिस कॉलेजच्या सेनापती बापट रोड कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एका विद्याथिर्नीला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचा अहवाल आल्यामुळे हा कॅम्पस १३ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रिय स्वाश स्पर्धा पुढे ढकलंन्यात आली आहे. अनेक शाळा पुढे हाच प्रश्न उभा ठाकला आहे. मास्क घेउन कितपत फायदा होइल याची काही कल्पना नाही. एकुणच परिस्थिती काही चांगली नाही. कोणी नुसता शिंकला तरी लोक त्याच्याकडे भीतीने बघतात. रस्त्यावरून चालताना मास्क घातलेले लोक बघितले की जैन लोकांची फेरी निघाली आहे की काय अशी शंका येते.

पण काही म्हणा, नेहमी एकमेकाना पाण्यात पाहणारे दादा, भाई, पाटिल याना काही स्वाइन फ्लू बद्दल काही चौकशी भेट घ्यावेसे वाटले नाही. दादंचे वाढदिवसाचे बोर्ड लागले आणि स्वाइन फ्लू आला. आता ह्या योगाला काय म्हणावे ते कळत नाही. नेहमी नागरिकांच्या बद्दल प्रेम असणारे हे नेते  सध्याला वांटेड आहेत. जहागीर हॉस्पिटल मध्ये देशातील पहिला स्वाइन फ्लू चा बळी गेल्या पासून कधीही न येणार्या मीडिया वाल्याच्या गाड्या आता दिसू लागल्या आहेत. काय म्हनाव आता, या स्वाइन फ्लू ने शतक तर पूर्ण केलच आहे. महानगरपालिका तिच्या परीने प्रयत्न करती आहे. नायडू हॉस्पिटल थोड्या फार प्रमाणात मदत होते आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.