पुण्यात काहीही घडू शकते


पुण्यात काल दोन बांगलादेशींना अटक झाली. दोघेही आठवी नापास. एकाच नाव अब्दुल हक आणि दुसरा मामून रैफ. घुसखोरी करून ते प्रथम मुंबईत आले. मामून रैफ १९९५ तर अब्दुल २००३ मध्ये भारतात आले. पुण्यात एका मोठ्या कंपनीत अब्दुल हक प्रोजेक्ट इन्चार्ज, त्याचा पगार एक लाख वीस हजार. तो देखील महिन्याचा. आणि मामून रैफ ला वीस हजार महिन्याचा पगार. त्यांनी बरेच पैसे कमावले. इथे लग्नही झाली. त्यातला अब्दुला वानवडीला तर मामून रैफ हिंजवडीला राहायला होता. त्यांनी शाळा सोडल्याचा खोटा दाखल्यापासून ते खोट्या पासपोर्ट पर्यंत सगळ जमवलं. आता पकडले गेले. पण पुण्यात काहीही घडू शकते.

आताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आले होते. त्यांनी लादेन आणि कसाबचे रेशनकार्ड दाखवले. मी माझ्या रेशन कार्ड साठी मागच्या अडीच महिन्या पासून मनपा च्या फेर्या मारतो आहे. ते तर सोडाच, परवा कलमाडी भाई नि झाडू घेतला. आणि पुणे आठवड्या भरात झाडून साफ करणार अशी घोषणा केली. फोटो झाले. भाषण झाले. मग काय भाई नि झाडू फेकून दिला. वा भाई वा. नाही तेव्हा वाद घालणारे  सध्याला बेपत्ता आहेत. मी रोज पुणे स्टेशनला येताना प्रत्येक रेल्वे स्टेशन च्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्या बघतो. त्या झोपडपट्यात आता नुसते वार्ड नाही प्रभाग बनलेले आहे. त्यातील लोक रेलवेच्या रुळावर संडास करताना सकाळी सकाळी बघावे लागते. काय करणार? दादा ना म्हणे जागतिक दर्जाचे शहर बनवायचे आहे. आणि भाई ना पुण्यात ओलम्पिक भरावयाची आहे. काय गरज आहे. आता पण झोपड्यांचे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. बर एक गोष्टीचे मी निरीक्षण केले आहे. कि झोपड्या मोक्याच्या ठिकाणीच आहेत. आणि त्यात राहणाऱ्या लोकांना मराठी येत नाही. असो मुद्धा हाच कि पुण्यात काही पण घडू शकते. उद्याची धारावी पुणे स्टेशनच्या बाजूला वाढत आहे. म्हणतात ना पुणे तिथे काय उणे. ते बरोबरच आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.