पुण्यात स्वाइन फ्लू पेक्षाही घातक मास्क फ्लू


आज सकाळी ९ ची लोकल हुकली. बसने गेलो. कंपनीत आल्या आल्या माझ्या काही सहकारी मैत्रिणी मला विचारू लागल्या की, तू रोज लोकल ने येतो ना? मग मास्क घेतला का? मी म्हटल की लोकलने येतो परंतु मास्क घेतला नाही. झाल त्याना जणू काही भुत बघितल्या सारखेच माझ्याकडे बघू लागल्या. मला म्हणाल्या की, तू घे नाही तर आम्हालाही होइल. एकून डोकाच सरकल. मी त्याना सरळ सांगितल की अस वाटत असेल तर माझ्यापासून दूर रहात जा. बर संगणक चालू करतो तोच माझा एक दोस्तने जी टॉक वर मला तोच प्रश्न की मास्क घेतल का? आधीच या प्रश्नाने डोक सरकवल होत त्यात हा. त्याला म्हटल की नाही घेतला, आणि घेइल की नाही त्याचा अजुन विचार केलेला नाही. कदाचित त्याला समजल असाव. तो फक्त अस म्हणाला की, घेतल नाही तरी काही बिघडत नाही परंतु काळजी घे.

नंतर तो म्हटला की “माझ्या मोठ्या बहिणीला स्वाइन फ्लू लक्षणे दिसत आहेत. ती आज जाणार आहे दवाखान्यात…वातावरण चांगले नाही आहे” . त्याचा रूम पार्टनर काल रात्री दचकून उठला आणि मोठ्याने ओरडला की मला स्वाइन फ्लू झाला. एकून हसुच फुटले. पुढे तो म्हटला की आज त्याच्या बस मधे एक जण खोकत होता तर ते बघून त्याच्या जवळ कोणी बसायला तयारच होइना. ते म्हणतात ना भीत्यापाठी ब्रम्हराक्षस तस झाले पुण्यातील लोकाना. खर तर स्वाइन फ्लू पेक्षा जास्त अफवा फ्लू झाला आहे. बर तो गेला तर एक दूसरा मित्र ऑनलाइन आला आणि तोच मास्क्चा प्रश्न. बर थोडा वेळ होतो ना होतो लगेचच माझ्या कोकण मधील काकुचा फ़ोन. की जपून रहा. कुठे फिरू नको. तोंडाला काही तरी फड़क लावत जा. तीला समजावून फ़ोन ठेवला की नाही लगेचच मातोश्रींचा फ़ोन. झाल तीच पुराण सुरू, ताज पाणी पी, जेवण बाहेर करू नको.

दुपारी जेवण झाल्यावर मी सकाळी घडलेला प्रकार मी माझ्या बॉस च्या कानावर घातला. तो म्हटला स्वाइन फ्लू कुठेही होवू शकतो, तू लोकल ने येताना काळजी घे. आणि सकाळी त्या बोलाल्याच मनाला लावून घेऊ नको. त्याच बोलन एकून काय बोलाव हेच समजेना. रात्री घरी आलो तर माझ्या जुन्या कंपनीतील मित्राचा एस म् एस “देव तुला चांगले आरोग्य देवो. सगळ्या रोगांपासून तुझा बचाव होवो ” एकुणच काय तर सगळेच अफवा फ्लू चे बळी. खर तर स्वाइन फ्लू पुण्यात आहे. परंतु तो असन्या पेक्षा ही जास्ती त्याचा बाऊ होतो आहे. म्हणजे शाळा बंद, महाविद्यालये बंद, चित्रपट गृहे बंद. याचा हेतु की या स्वाइन फ्लू चा प्रसार होवू नये. परंतु याचा अर्थ लोक जणू काही सुलतानी संकट आले आहे. आणि कोणी खोकला, किंवा कोणाला सर्दी झाली तर त्याला स्वाइन फ्लू च्या नावाखाली त्याच्या पासून दूर रहा अस होत नाही. बर स्वाइन फ्लू कसा असतो आणि त्याची लक्षणे काय हे देखील माहिती आहेत याना. परंतु तरी देखील अतिरेक करत आहेत. बर मी अनेक लोकाना तो मास्क उलटा लावून जाताना बघितले आहे.

मास्क चे आयुष्य १२ तासांचे आणि हे दोन दोन दिवस घालणार. जेवण आणि अंघोळ सोडली तर ते मास्क काढायला तयार नाहीत. या मास्कच्या प्रकार आल्यापासून सिगरेट पिनार्यांची खुप मोठी पंचाईत झाली आहे. तो मास्क काढावा तर स्वाइन फ्लू ची भीती. आणि नाही काढला तर सिगरेट कशी ओढणार?. आणि आज घरी येताना लोकलला गर्दी कमी होती. स्वाइन फ्लू ने अशा काही गोष्टी चांगल्या घडवून आणल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.