पुन्हा एकदा सगळ फूस


आता ना, माझा माझ्यावरच माझा विश्वास राहिलेला नाही. आजही ती कॅन्टीनमध्ये माझ्या जवळच्या बाजूच्या सीटवर, म्हणजे दोन सीट सोडून बसली होती. ती नाश्ता आणायला गेली. आणि माझी हिम्मतच होत नव्हती तिथे बसायची. काय करू, मी तिच्याशी बोलायची आरशासमोर खूप सराव केलेला होता. या शनिवार रविवार हेच तर केल. तिची खूप आठवण यायची. कोणी मुलगी दिसली तीच वाटायची. आणि आज मी लवकर उठून देखील आलो. पण सगळ फूस.

ती समोर आली की, मला काहीच करता येत नाहीत. अगदी अंगात ताकद नसल्याप्रमाणे वाटते. आणि डोक काम करायचेच बंद होते. श्वास सोबतच देत नाही. धडधड खूप वाढते. आणि हे सगळ अस घडायला सुरवात झाली की, हिम्मतच होत नाही. आणि समोर असली की शब्दच फुटत नाहीत. आणि त्यात आज मी एक खूप खूप जुना शर्ट घालून आलो आहे. शनिवारी कपडे धुवायला टाकतांना लक्षातच आल नाही की मी सगळेच कपडे धुवायला टाकतो आहे. आणि धुवायच्या वेळेस खूप हाल झाले. हात दुखले. म्हणजे ते काही फार मोठे नाही. पण ते कपडे वाळलेच नाहीत. त्यामुळे इस्त्री सुद्धा नाही. आज करील. पण तात्पुरता म्हणून एक अडीच वर्षापूर्वीचा एक शर्ट घालून आलो आहे. म्हणजे मी मुंबईमध्ये असतांना वापरायचो तो. त्यामुळे आज मुंबईमधील खूप आठवणी ताज्या झाल्या आहेत.

असो, आज मी खूपच डब्बा दिसतो आहे. अगदी काका टाईप. आणि ती आज त्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काय दिसती आहे म्हणून सांगू. तिला बघून मग बोलायचे कस, अस झाल आहे. तसं ती माझ्या डेस्क जवळून जातांना ‘हाय’ केल. पण ते देखील डब्बा. आज तिला तिच्या कामात मदतीची गरज लागली तरच थोड फार बोलायचं चान्स आहे. नाहीतर, तिने मी कॅन्टीनमधून पळून गेल्यावर काय विचार केला असेल देव जाणे. काय करू? ती समोर आली की हे अस होत. ती नसेल त्यावेळी तिची खूप आठवण येते. आणि समोर आली की हिम्मतच जाते. त्यात हा सगळा चेहरा तेलकट झालाय. असो, आज सकाळी सकाळी अस घडेल याची कल्पनाच नव्हती. सगळंच फूस झालाय.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.