पुन्हा कोणासाठी नोकरी शोधायची नाही


मध्यंतरी ती च्या लहान बहिणीने मला तिच्यासाठी अर्धवेळ(पार्टटाइम) नोकरी शोधायला सांगितली. खर तर मी आजकाल माझ्या स्वत:साठी नोकरी शोधात नाही. तर इतरांसाठी काय शोधणार? आणि मुख्य म्हणजे मला हे मनस्वी पटत देखील नाही. पण म्हटलं तीची बहिण आहे. तर चला बघुयात. याआधी मी कधीच कोणासाठी माझ्या बॉसशी बोललो नाही. काल कशीबशी हिम्मत करून त्याला विचारले कि, तुमच्या पाहण्यात कोणती अकौंटची पोझिशन आहे का? असेल तर मला नक्की कळवा. माझी एक मैत्रीण आहे तिला हवी आहे. आता आमची कंपनी हि आयटी कंपनी त्यामुळे तिला हवी तशी पार्टटाइम आमच्या कंपनीत मिळणे अवघड.

माझा बॉस मला म्हणाला कि, तिला आपल्या कंपनीत का नाही बोलावत? आपल्या कंपनीत देखील एक जागा रिकामी होणार आहे. त्यांना म्हटलं कि, तिला पार्टटाइम नोकरी हवी आहे आणि ती देखील अकौंटची. आपल्या इथे तर आयातीच्या जागा आहेत. तर तो म्हणाला ठीक आहे, मी बघून सांगतो. मला खात्री होती, कि तो माझी विनंतीला काही ना काही सकारात्मक उत्तर देईल. त्याने ताबडतोप एका तासात मला एक इमेल आयडी दिला आणि म्हणाला कि तुझा मैत्रिणीला तिचा रिझ्युम पाठवायला सांग. मी त्याला माझ्यामुळे त्याचे वजन खर्च करायला लावले. आणि त्याने केलेही. नंतर मी तिच्या लहान बहिणीला फोन लावला तर ती लोकलमध्ये होती त्यामुळे, तिच्याशी काही नीट बोलता आले नाही. तीला मी तुला एसएमएस करतो म्हणून सांगितले. माझ्या एका मित्राने मला मी जिथे राहतो तिथल्या एका सीए चे नाव सांगितले. आणि म्हटले की तिथे अशा पद्धतीच्या नोकर्या मिळतात. चौकशी कर अस सांगितलं. मी ते आणि माझ्या बॉसने दिलेला इमेल एसएमएस केला.

मला वाटत होत की, ती ताबडतोप तिचा रिझ्युम पाठवेल. आज केला का अस विचारण्यासाठी फोन केला तर तिचा अजून रीझ्युमच बनवून झाला नव्हता. आणि तिच्या बोलण्यावरून तरी मला ती काही पार्टटाइम नोकरी वगैरे करण्यात फार काही इच्छुक वाटली नाही. ती म्हणाली कि आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळी बोलू. ऐकून काय म्हणावे अस झाले. माझ्या बॉसने शब्द टाकला असेल, आणि आता ह्या बाई साहेबांचा मूड बदलला. दुसरा माझा मित्र इतके दिवस नोकरी बदलायची आणि तुझ्या कंपनीत असेल तर मला नक्की सांग अस म्हणणारा. आता आमच्या कंपनीत एक जागा रिकामी झाली आहे. म्हणून त्याला सांगितलं. बर त्याच्यासाठी मी पुन्हा माझ्या बॉसशी बोललो. आणि तो पण त्याला ताबडतोप बोलाव अस म्हटले. त्याला फोन करून सांगितले तर हा म्हटला की या शुक्रवारी येतो. मी परत बॉसकडे जावून त्याला फार गोडीत शुक्रवारी त्याला यायला जमेल तर शुक्रवारी त्याने आले तर चालेल का? अस विचारलं. त्यानेही पुन्हा एकदा माझ्याकडे बघून ठीक आहे अस म्हटला. आता माझा मित्र बोलतो की मला शुक्रवारी देखील यायला जमणार नाही. आणि त्याची कंपनी त्याचा पगार वाढवण्याबद्दल विचार करीत आहे. एकूणच त्याला काही त्याची कंपनी सोडावी अस वाटत नाही. आता दोनीही ठिकाणी माझीच गोची झाली ना. दोनीही वेळी माझ्या बॉसने त्याचा अधिकार असून देखील, एका मित्राप्रमाणे मला मदत केली. आणि हे दोन बहाद्दरांनी काही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. बर अस देखील नाही की मी माझ्या बॉसशी बोलण्याआधी या दोघांना कल्पना दिली नव्हती. कल्पना देवून सुद्धा यांनी आयत्यावेळी जे नव्हत करायचं तेच केल. मला तर आता न माझ्या बॉसशी बोलायला देखील लाज वाटत आहे. हे असे मित्र असतील याची आधी कल्पना नव्हती. आता मात्र पक्क ठरवलं आहे, की काहीही झाल तरी कोणाच्यासाठी नोकरी-बिकरी शोधण्याच्या फंदात पडायचे नाही. मग एखाद्याला राग आला तरी चालेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.