पुन्हा तेच..


पुन्हा तेच. कस बोलू? यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का?’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते टाईमपास करत बसलेले. मला म्हणाले ती आज टेन्शन मध्ये आहे. एक सेकंदसाठी खूप विचारांचे काहूर माजले, पण नंतर स्वतःला सावरले.

आज ती खूप खूप आणि खूप छान दिसते आहे. ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये, म्हणजे ती प्रत्येक ड्रेसमध्ये छानच दिसते. मी आज तिच्या डेस्क जवळून गेलो. पण ती नव्हती डेस्कवर. यार, ती आता माझ्या बाजूने गेली. हुश्श! ती आली की! सोडा. नेहमीप्रमाणे सगळा गोंधळ सुरु होतो. ती ‘पसारा’ सुद्धा होती तिच्या बरोबर. तिच्याशी बोलायची खूप इच्छा होत आहे. काल रात्री झोपच येत नव्हती. किती मोठा विरह. शुक्रवारी ती नव्हती आणि सोमवारी मी. कस होणार अस. आणि आज दोघेही आहोत. तर माझी हिम्मत पुन्हा होत नाही आहे. तिला कधी माझ्याप्रमाणे वाटणार? कधी कधी मनात विचार येतो, ती भेटणे शक्यच नाही. पण मग तिचा विचार सुद्धा जात नाही. आणि आता नाही तर कधी नाही. मला भविष्यकाळात रडत नाही बसायचे की मी त्यावेळी का नाही केले म्हणून. आजही ती ‘पसारा’ आणि तो ‘शेपट्या’ काय तिची पाठ सोडत नाही आहे. काय करू यार?? असो, पण मी आज काहीही झाले तरी तिच्याशी बोलणार. आणि हो, माझी तब्येत मस्त आहे अगदी आज.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.