पॅनकार्ड : नवे नियम


पॅनकार्ड अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर. त्याचे नवे नियम प्रसिद्ध झाले आहेत. दिनांक पाच डिसेंबर पासून ते कार्यान्वित होतील. केंद्रीय कर संचालक मंडळ (सीबीडीटी) यांनी हे पॅनकार्डचे नियम ठरवलेले आहेत. यात काही चांगल्या गोष्टी देखील आहेत.

एक व्यक्ती (व्यक्तिगत), जो अडीच लाख वा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार (रुपयांमधील) आर्थिक वर्षात करतो. त्याने दिनांक मे ३१, २०१९ रोजीपर्यंत वा त्यापूर्वी पॅनकार्डसाठी देखील अर्ज करणे आवश्यक आहे. एक व्यवस्थापक, निर्देशक, संचालक, भागीदार, विश्वस्त, निर्माता, संस्थापक, कर्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी किंवा पदाधिकारी अशा व्यक्तिंसाठी पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.

ज्यांची आई ही एकमेव पालक आहे. त्यांना वडिलांचे नाव देणे बंधनकारक नाही. त्यांच्यासाठी आईचे नाव देणे आवश्यक आहे. याआधी वडिलांचे नाव नमूद करणे आवश्यक होते. त्यात बदल करण्यात आला आहे.

ज्या संस्थांचे एकूण उत्पन्न /उलाढाल / विक्री पाच लाखांपेक्षा जास्त नाही त्यांनाही आवश्यक आहे. पॅनकार्ड कर मूल्यांकनासाठी एक महत्वाचा दस्तऐवज आहे. बँक खाती उघडणे आणि आयकर रिटर्न्स (आयटीआर) दाखल करणे यासाठी पॅनकार्डचे असणे आवश्यक आहे.

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.