प्रजासत्ताक दिन नवीन काय?


नेहमीच येतो पावसाळा.. तसं आहे या प्रजासत्ताक दिनाच. बोलाव का नको? अस मनात अजून येत आहे. बोलूच. प्रजासत्ताक दिनी सकाळमध्ये पंतप्रधान मध्यमवर्गीय मतदारांवर नाराज आहेत अशी बातमी वाचली. वाचून खर तर आश्चर्य वाटले. कारण त्या मध्यम वर्गीयांनी मतदान न केल्यामुळे पंतप्रधान पंतप्रधान बनले. आणि मुळात प्रजासत्ताक दिन हा सगळेच म्हणजे मी सुद्धा ‘हक्काची सुट्टी’ म्हणून पाळतो.  आणि मुळात आपला देश प्रजासत्ताक कधी होता? म्हणजे मला तरी वाटत नाही. 

साधी गोष्ट आहे मागील रविवारचा सकाळ चाळा, त्यात एका निवृत्त न्यायाधीशाला पुण्यात रेशनकार्ड मिळवण्यासाठी आलेल्या अडचणी दिल्या आहेत. सगळ होत पण त्यांना रेशन कार्ड मिळायला चार महिने लागले. त्यांनी तर रेशनकार्ड मिळाल्यावर ‘पुत्रप्राप्ती’ झाल्या एवढा आनंद झाल्याच म्हटलं आहे. भाववाढ, निकृष्ट दर्जाची प्रवासी सेवा, रस्ते आहेत की खड्डे?, घडणारे अपघात, अतिरेकी हल्ले. या सगळ्या गोष्टी मागील कित्येक वर्षांपासून चालू आहेत. आणि नेहमीच प्रजासत्ताक येतो. खोट्या आणि स्वप्नातल्या गप्पा आपले राष्ट्रपती आणि पंतप्रधान मारतात. आता ते त्याचं भाषण कोणी ऐकत का? हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. पण मी बघतो. तरी देखील तेच तेच रटाळ आणि सगळ्या अपेक्षा आपल्या राष्ट्रपतीबाई वाचून दाखवतात. त्या बोलण्यात ना तळमळ ना कुठे राष्ट्राने ऐकावं अस काही लबक. हे आपले पोपटपंची. नुसत लिहिलेलं वाचून दाखवणारे. ते ‘चतुर’ सारखे. तुम्ही थ्री इडीयट पहिला असेलच. 

आम्ही राष्ट्रासाठी जीवन अर्पण करायचं ही त्यांची इच्छा. त्या संसद भवनावर हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले जवान स्वर्गात बसून डोक आपटत असतील. कशाला त्या अतिरेक्यांशी लढलो. आणि का बलिदान दिल. तसंच तुकाराम ओबाळे पण देवाला सांगत असतील की माझी फार मोठी चूक झाली. माझ्यामुळे कसाबला कोणतेही कसब नसताना ३१ कोटींचे पेकेज मिळाले. असो, फार काही बोलत नाही. मला तरी या प्रजासत्ताक दिनी काही विशेष वाटले नाही


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.