प्रपोज


प्रश्न प्रपोजचा नाही आहे. आता कसं सांगू यार! प्रपोज करणे फार अवघड गोष्ट नाही आहे. मी ते करू शकतो. नक्की करू शकतो. प्रश्न हा आहे की, म्हणजे स्पष्टच बोलतो. तीच्या मनात नेमक काय चालू आहे. हे कळायला मार्गच नाही. मुख्य म्हणजे ती नेमकी कशी आहे, हेच कळेनासे झाले आहे. कधी वाटते तीचा स्वभाव रागीट आहे. कधी वाटते, ती खुपंच समजूतदार आहे. मी ज्या ज्या वेळी तिला पाहतो. त्या त्या वेळी ती नवीन वाटते. माझा स्वभाव नकारात्मक नाही. माझ्या मनात न्यूनगंड देखील नाही. मी वस्तुस्थितीबद्दल बोलतो आहे. पण तिच्यासमोर मी काहीच नाही. मी पुन्हा जुनाट विषय काढत नाही आहे.

पहा, मी काही गोष्टी ठरवल्या होत्या. निदान तिला मनातील सांगायचे तरी हे हवेच. एक म्हणजे माझे शिक्षण, दुसरे जॉब, तिसरे घर. आता यातील शिक्षणासाठी वेळ लागणार हे तर नक्की. दुसरा जॉब. निदान पर्मनेंट. आता ती गोष्ट वेगळी की हाच माझा पहिलाच कंत्राटी जॉब आहे. पण चूक सुधारायला हवी. आणि तिसरे घर. सध्याला आहे ते ‘ठीक’ आहे. कदाचित चुकीचे वाटेल. मला माहिती आहे की, प्रेमात अस काही नसते. प्रेम ‘आंधळे’ असते. सगळ् मान्य. आणि मला हे देखील माहिती आहे. या सर्व गोष्टी मिळवल्यानंतरही तिचे उत्तर आणि आता विचारल्यावर देखील उत्तर ‘एकच’ असेल. आता मी ह्यावरून हे सगळे म्हणतो आहे की. ना मला मागील तीन महिन्यात चांगला दोस्त होता आले. आणि नाही साधे ‘बोलता’ आले. आणि ज्या ज्या वेळी ती स्वतःहून माझ्याशी बोलली, त्यावेळी मी भलतीच उत्तर देऊन तिला नाराज केले. माझी ही चूक आहे. मी तिच्यासमोर नेहमीच ‘चिंधी’गिरी केली. कदाचित काही चांगल्या गोष्टी असतील देखील! पण तिच्यासमोर मी ना खऱ्या गोष्टी दाखवू शकलो. आणि ना खोट्या गोष्टींनी तिला इंप्रेस करू शकलो. जो आहे, तो देखील तिला मी दाखवू नाही शकलो.

आता मला सांगा, अस मी जाऊन तिला माझ्या मनातील सांगितल्यावर ती ‘शॉक’ होणार नाही का? ती नक्की, कोण कुठला साधा हाय बाय करणारा आज मला येऊन ‘प्रपोज’ करतो आहे, असाच विचार करेल. वस्तुस्थिती हीच आहे. प्रेम आहे. ती आवडते. तीच हवी. तिच्याशिवाय नाही राहू शकत. आणि ती सोडून दुसरा विचार येतही नाही. हे देखील मान्य. पण तीच्या दृष्टीने विचार केला तर उत्तर हेच असेल. आता जर कदाचित ‘हेमंत आठल्ये’च्या जागी ‘हृतिक रोशन’ असतो तर ती मला पाहूनच वेडी झाली असती. मी केलेलं प्रपोज पाहून बेशुद्ध देखील पडली असती. पण हे ‘स्वप्नातच’ घडू शकते. मी या गोष्टीवर रोजचं विचार करतो. रोज तीच्या फोटोसमोर प्रॅटिस करतो. मुळात अजूनही हे स्वप्न असल्याचा भास होतो आहे. सगळ्याचं अशक्य गोष्टी घडतं आहेत. इतकी सुंदर, गोड मुलगी असू शकते. आणि ती माझ्याशी बोलते. ती एक सत्यातले ‘स्वप्न’ आहे. हा कल्पनाविलास नाही.

मी त्या नवीन कंपनीच्या ‘ऑफर लेटर’ची वाट पहात आहे. आता ते ह्यासाठी की, ते माझे ‘हक्काचे घर’ असेल. अस ‘भाड्याचे’ नसेल. आणि ते मिळाले की, या कंपनीला मी माझा राजीनामा उर्फ ‘घटस्फोट’ देईल. या गोष्टीने तसा फारसा फरक पडणार नाही. पण तरीही! माझ्या मनाचे समाधान की, मी निदान तीच्या थोडाफार लायकीचा आहे. नाहीतरी माझे वक्रतुंड आणि महाकाय काया पाहून त्या सुंदरीला कसे शोभेल, हा देखील प्रश्न आहे. पण काहीही असो मी ही ‘एक अधुरी प्रेम कहाणी’ होवू देणार नाही. तिला मनातील नक्की सांगेल. आज दोन आणि उद्या एक असे तीन ‘कांद्या पोह्याचे’ कार्यक्रम आहेत. पाहुयात त्या तिघींत कोण होकार देते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.