प्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले?


उत्तर- इसवी सन २००४ पासून भारत नावाच्या देशामध्ये मनमोहन नावाचा राजा राज्य करीत होता. गुणी, सद्गुणी, हुशार असा आहे समज समस्त देशात पसरलेला होता. तो आला आणि देशाचे चित्रच पालटून गेले. दु:खी असलेले प्रजाजन अधिकच दु:खी होवू लागले. राजाच्या निर्णयाचा फटका सर्वच लोकांना बसू लागला. राजाच्या मंत्रिमंडळातील मंत्री रोजच खजिन्यावर धाडी टाकू लागले. शेजारील देश तर रोजच हल्ले करू लागले.

देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. महागाईचा भडका उडाला. राजाचे निर्णय चुकत असून देखील राजा बोध घ्यायला तयार नव्हता. प्रत्येक चुकीच्या गोष्टीला तो थांबवायला तो धजत नव्हता. हळूहळू लोकांच्या रागाचा पारा वाढू लागला. राजाच्या निषेध सर्वत्र होवू लागला. लोक राजाला ‘बैल’ म्हणू लागले. अशा रीतीने मनमोहन राजाचे नाव बैल राजा असे पडले.

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.