प्रिटी वूमन


दाराची बेल वाजते. दार उघडले जाते. प्रिटी वूमन समोर येऊन ‘नमस्कार, कसा आहेस हेमंत?’ . मी ‘चांगला’. प्रिटी वूमन ‘या’. घरात गेल्यावर, ‘आपले अभिनंदन!’. प्रिटी वूमन हसून म्हणाली ‘धन्यवाद, पण मला माहिती आहेस की तू कुणाच्या म्हणण्यावरून इथे आला आहेस’. मी ‘नाही, मी तुमचे अभिनंदन करणारच होतो’. ‘मला माहिती आहे, अनुक्षरे ताईच्या बोलण्यावरून तू इथे आला आहेस’. मी ‘हो, पण माझ्या मनात सुद्धा यायचे होते’.  ‘पण तुम्हाला अनुक्षरेताई कशा काय माहित?’ मी म्हणालो. प्रिटी वूमन ‘अरे, मी तुमचे ब्लॉग वाचते’. मी म्हणालो ‘पण तुम्हाला मराठी..येते?’. प्रिटी वूमन ‘हो, मुंबईत यायचे म्हणजे मराठी आलीच पाहिजे’. मी ‘वा!’. प्रिटी वूमन ‘बोल अजून काय म्हणतोस?’. मी ‘आपली मुलाखत घेण्याची इच्छा होती’. प्रिटी वूमन ‘कर सुरु’.

मी – तुम्ही एक खूप नावाजलेल्या अभिनेत्री आहात. आपण अनेक वेळा आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात आल्या आहात. मग आपण ‘हिंदू’ धर्माबद्दल आणि हिंदू संस्कृती बद्दल ओढ कशी काय निर्माण झाली?
प्रिटी वूमन – अरे, जाण्या येण्याने ओढ निर्माण झाली. आणि यावेळी धर्माचा अभ्यास केल्याने हिंदू संस्कृतीचा एक भाग बनण्याची इच्छा झाली.
मी- धर्माचा अभ्यास?
प्रिटी वूमन- अरे हेमंत, ‘दिसामाजी’ कधीतरी अभ्यासाची ओढ निर्माण झाली.
मी- अच्छा अच्छा! म्हणजे आपणाला अभ्यासाची आवड आहे तर!
प्रिटी वूमन- नाही रे! शाळेत मला अभ्यास म्हटलं की, ‘डोक्यात कुठला तरी भुंगा भुणभूणतो’ आहे अस वाटायचे.
मी- काय?
प्रिटी वूमन- खरंच! आई वडिलांनी मला खूप लाडावून ठेवलं होते.
मी- हिंदू धर्माचा अभ्यासच का करावा वाटला?
प्रिटी वूमन- ‘काय वाटेल ते’ काय विचारतो आहेस?
मी- मला फक्त अस म्हणायचे होते की दुसरा कोणता धर्माचा अभ्यास करावासा का नाही वाटला?
प्रिटी वूमन- अच्छा! कारण हिंदू धर्मात आणि संस्कृतीत जीवनाचे ‘अमृतमंथन’ केलेले आहे. आणि अनेक ‘दृष्टीकोना’तून त्याचे ‘दिलखुलास’ विवेचन आहे. म्हणून ‘सहजच’ या धर्माची ‘दवबिंदू’ व्हावे अशी इच्छा झाली.
मी- कसा वाटतो हिंदू धर्म?
प्रिटी वूमन- हिंदू धर्म हा मनुष्याच्या जीवनाचा ‘निवडक आनंदघन’ आहे. ‘मी आणि माझ मन’ या हिंदू धर्माचे ‘तंत्रज्ञान’चे आभारी आहोत. या धर्म निवडणे म्हणजे ‘वळवाचा पाऊस’ नाही. आणि आता मला हिंदू म्हणून नवीन ‘सृजनपालवी’ मिळालेली आहे. या हिंदू धर्मात ‘प्रवाहाविरुद्ध जाणारे विचार’ देखील मान्य असतात. ‘माझ्या मनाचिये गुंती’ हिंदू धर्माच्या ग्रंथसंपदानी माझे ‘भावनातरंग’ अजून ‘स्पंदन’ पावल्या आहेत. माझे आधीचे जीवन ‘शिंपले आणि गारगोट्या’प्रमाणे होते. पण आता ‘नचिकेता’प्रमाणे वाटते आहे. हिंदू धर्म हा मनुष्य धर्माचे एक ‘आल्हादक प्रतिबिंब!’ आहे.
मी- बापरे! तुम्ही तर खूपच गहन अभ्यास केलेला आहे. आणि त्यावरून हा निर्णय घेतला दिसतो आहे.
प्रिटी वूमन- ए झंप्या! मी असाच कोणताही निर्णय घेत नसते.
मी- अगदी. निर्णय घेतांना काही अडचणी आल्या?
प्रिटी वूमन- निर्णय घेतांना मी जी ग्रंथ संपदांची आणि माझ्या मनाची स्तबक स्थिती न होण्याचे कारण हेच की त्याआधी वाचलेली अक्षरधूळ. ‘निशिगंधा’चा सुवास प्रमाणे माझा आधीचा ‘रानमोगरा’ फुलला. हिंदू धर्मात सर्व काही आहे. अगदी ‘राजधर्म’ पासून ते ‘हसण्याचा आकारा’पर्यंत. पण मोडजत्रा नाही. हिंदू धर्म हा ‘सुकामेवा’ आहे.
मी- खरंच तुमचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.
मी हसून – आपण मला जी दिलखुलास मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद!!!
प्रिटी वूमन हसून- मी काही हेमंत आठल्ये किंवा सुहास नाही. नेहमी अधूनमधून ‘येss रे मना येरेss मना!’ करायला. मी नेहमीच ‘सावधान’ असते.
मी हसून – हो हो, अगदी!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.