प्रेम आणि आकर्षण


म्हटलं तर फार फरक नाही. आणि म्हटलं तर खूप फरक आहे. म्हणजे खरं सांगतो. अप्सरा भेटण्याच्या आधी मला दर दहा मिनिटाला एक आवडायची. मुळात मुली एवढ्या सुंदर का असतात हाच न सुटलेला मला प्रश्न आहे. कालच्या त्या एका प्रतिक्रियेने मलाही थोडा वेळ असंच वाटलं होत, की मी अप्सराच्या सौंदर्यावर फिदा आहे? की मला ती खरंच आवडते? काल ती दिवसभर कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि त्यात ती प्रतिक्रिया. असंच अप्सरा बद्दल विचार करीत चाललो होतो. तर संध्याकाळची पाचची बस चुकली. मग आणखीन वैताग आला. कारण त्यापुढची बस ७:४५ ला. मग जणू काही जेल मध्येच आहे अस वाटायला लागले होते. ती नव्हती तर कंपनीत एक एक मिनिट काढणे खूप त्रासदायक वाटत होते. पुन्हा माझ्या फ्लोरवर जाण्यासाठी निघालो. मनात तिची इतकी आठवण दाटून आली होती ना! गंगा यमुना यायच्या बाकी होत्या.

कॅन्टीनमधून निघून अड्मिन सेक्शनच्या बाजूने पुढे चाललो तर ‘अप्सरा’ दिसली. किती आनंद झाला म्हणून सांगू. सुरवातीला स्वप्न तर नाही ना अस वाटायला लागले. तोंडातून तिला पाहून ‘अरेs’ अस बोललं गेल. तिने मला पहिले आणि नुसतीच ‘हाय’ बोलली. आणि निघून गेली. मग सगळ छान वाटायला लागलं. मला वाटल ती तीच्या डेस्कवर येईल. पण ती आली नाही. मग पुन्हा तिची आठवण यायला लागली. पण डोक दुखायचे कमी झाले होते. असो, मला खूप बोलायची इच्छा होती. पण ती फक्त ‘हाय’ म्हणून वॉशरूम मध्ये गेली. मी पण ना, तीने काय विचार केला असेल, असा विचार मनात येत होता. कंपनीतून येतांना ते आज सकाळी उठेपर्यंत तिचाच विचार मनात येत होता. आताही तीच आठवते आहे. म्हणजे आधी दर दहा मिनिटांनी आवडणाऱ्या मुली छान नव्हत्या अस मी म्हणतच नाही आहे. पण त्या यायच्या आणि जायच्या. अगदी खर सांगू का? मी त्यांना पाहतांना पहिल्यांदी माझी नजर त्यांच्या चेहऱ्याकडे पण फार फार तर एखादा सेकंद, त्यापुढे छातीकडे जायची, नंतर कमरेवर आणि नंतर पायाकडे. प्रत्येक मुलगा/पुरुष याच रेषेत मुलींना पाहतो. आणि त्यावरून ठरवतो की मुलगी सुंदर आहे की नाही. चेहऱ्याने कितीही सुंदर मुलगी डारेक्ट ती सुंदर आहे अस म्हणणार नाही. आणि ती सुंदर वाटली तर, मुले तिच्यावर फिदा होणार. तिला पहात राहाणार. आता मी सगळे माझ्या स्वतःच्या आणि मित्रांच्या वर्तनावरून सांगतो.

अशा मला अनेक मुली आवडल्या. माझी एक मैत्रीण आहे. ती सुद्धा खूप खूप सुंदर आहे. म्हणजे कोणी तिला पहिले आणि फिदा झाले नाही तर नवलच. पण तिच्याशी बोलतांना माझ्या अंगावर किंवा तीच्या येण्याने रोमांच उठले नाही. म्हणजे कधी तीचा स्पर्श झाला तरच. म्हणजे एकदा (फक्त एकदाचं!) पुण्यातून निगडीला येतांना बसने तिला खूप झोप आली होती. आणि ती माझ्या खांद्यावर डोके ठेऊन झोपली होती. त्यावेळी असे रोमांच उठलेले. पण अप्सरा समोर आली तरी, माझ्याशी बोलतांना सुद्धा, तीच्या नुसत्या एका नेत्र कटाक्षाने, तीच्या हसण्याने. आणि ती असण्यानेच माझ्या मनात आणि शरीरावर रोमांच उठतात. त्या दर दहा मिनिटं वाल्यांच्या कधीच डोळ्यात बुडून जाव वाटलं नाही. कधी त्यांना पाहून माझ्या मनात ‘ही माझी झाली तर..’ असा विचार आला नाही. ‘कसली मस्त आहे..’ असा विचार आला. आणि मुख्य म्हणजे त्या दिसायच्या आणि पुढच्या दहा मिनिटांनी दुसरी तिच्याही पेक्षा सुंदर दिसली की मला मग ती आवडायची. मग त्यावेळी सुरवातीला पाहिलेली बंडल वाटायची. असंच चालू होते.

मी जी स्थळ पाहिली त्यातील एका मुली बद्दलच ‘ही माझी झाली तर..’ असा विचार आला होता. तीचा आणि तीच्या आई वडिलांचा होकार होता. पण तीच्या काकांना सुबुद्धी झाली आणि त्यांनी नकार दिला. पण त्यावेळी त्या मुलीला पाहिल्यावर ती ओळखीची वाटलीच नाही. ‘अप्सरा’ पहिल्यापासून तिची आणि माझी अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे वाटते. फक्त तिच्यासमोर गेल्यावर माझी हिम्मत होत नाही तिला बघायची आणि बोलायची. आता याला प्रेम म्हणायचे की आकर्षण मला माहित नाही. पण ती आल्यापासून माझे सगळ्याचं गोष्टी बदलेल्या आहेत. सगळेच छान वाटते. याआधी मी पळायला, तीच्या एकदाचं बाईकचा विषय घेण्याने मी बाईक शिकली. शिक्षण विषाप्रमाणे वाटायचे. आता तेही पूर्ण करण्याची इच्छा काय मी परीक्षेचा फॉर्म भरला. व्यायाम चालू होता. पण नियमितपणे अनियमित. तीच्या येण्याने तोही नियमित झाला. नुसता झाला नाही तर वाढला.

त्या सर्व सुंदर सुंदर मुली पाहून अस कधी घडलंच नाही. याआधी मी कधीच इतका कोणासाठी व्याकुळ झालेलो नव्हतो. मला खरंच काहीच कळत नाही, मी काय करतो आहे हे? आई वडिलांच्या परवानगी शिवाय मी कोणतीच गोष्ट केलेली नाही. पण यावेळी अप्सराला पाहून या गोष्टी आपोआपच घडतं जात आहेत. काय करू मला सगळीकडे अगदी दिसेल त्या मुलीत तीच दिसते. तीच आहे असे वाटत रहाते. दुसऱ्या कशातच रस नाही वाटत. कदाचित हे आकर्षण असेल किंवा स्वप्न. पण जे आहे, मला हवे आहे. दुसरे तिसरे काहीच नको. फक्त ती हवी..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.