फक्त अप्सराच


कालचा दिवस. आहाहा! काल ती त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि तिची ती निळ्या रंगाची ओढणी. आणि माझ्या ड्रेसचा रंग निळा. खूप छान वाटलं. काल देखील शेवटीच तिनेच ‘हाय’ केले. ती माझ्या डेस्कजवळून जातांना माझ्याकडे पहात जाते. आणि इतकी छान स्माईल देते. काल अस, दोन तीनदा घडलेलं. परवा तिची मीटिंग संपली. आणि मी त्या मीटिंगरूम च्या जवळून चाललेलो. खर सांगायचे झाले तर मुद्दामच. तिने मला पाहून इतकी छान स्माईल दिली. आजकाल आम्ही दोघेही एकमेकांसमोर आलो की हेच चालते. ती इतकी छान स्माईल देते. आणि लाजल्यासारखं हसतो. पण हालत खराब होते. काल मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती. पण तिचे स्टेटस बिझी होत. म्हटलं ती कामातून फ्री होईल त्यावेळी बोलू. पण दिवसभर असंच.

काल माझा एक मित्र आजारी, दुसरा आलाच नाही. तिसरा कामात. मग एकटाच गेलो दुपारी त्या नव्या कॅन्टीनमध्ये. जेवण करून मी माझ्या इमारतीत येतांना तिला पाहिलं. तीच लक्षच नव्हत. पण कसली छान हसत होती म्हणून सांगू. मी डेस्कवर बसल्यावर ती आणि तिची मैत्रीण पाणी आणायला चाललेले. त्यावेळी तिची स्माईल. कलीजा खलास होतो यार. यार तीच्या मैत्रिण आणि मित्रांना मी मुद्दामहून त्यांना टाळतो अस तर वाटत नसेल ना. कदाचित असेलही वाटत. कारण ज्या ज्या वेळी ती तीच्या मित्र मैत्रिणींमध्ये असते त्यावेळी माझे लक्ष फक्त तिच्याचकडे असते. असो, तीच्या वानरसेनेतील तिची ती ‘पसारा’ मैत्रीण आणि तो ‘मावशा’ चांगले आहेत. उगाचंच मी त्यांना नावे ठेवली. आता पासून पुढे नाही अस बोलत जाणार त्यांना. म्हणजे ते दोघेही तीच्या सोबत असतात. पण अस मित्र म्हणून. ती जी ‘पसारा’, सॉरी सॉरी तिची मैत्रीण आहे ना, ती देखील चांगली आहे.  आमचा निम्मा फ्लोर तीचा दिवाना आहे. पण अप्सरा समोर सगळेच ‘पाणीकम’.

काल दुपारी साडेचारच्या सुमारास तो शेंड्या आणि तो नारळ सोबत ती खाली गेली. त्यावेळी खूप म्हणजे खूप राग आलेला. कंट्रोलच होत नव्हते. डोळ्यात पाणी. दोनदा तोंड धुवून देखील तसच. माझा काल मित्र नव्हता आलेला. त्यामुळे पाचची बससाठी खाली गेलो. जातांना कॅन्टीनमधून गेलो. मुद्दाम. कारण ती कॅन्टीनमध्ये असते यावेळी. पाहतो तर ती तीच्या मित्र मैत्रिणी सोबत. मग मलाच खजील झालं. मी खूप लवकर टोकाचा विचार करतो अस आता वाटत आहे. ती इतकी छान हसत होती. बस पहात रहाव असंच वाटत होते. तिला ‘बाय’ केल. आणि तिने इतके मस्त हात वगैरे हलवून बाय केल. अजूनही तेच आठवते आहे. आज, उद्या आणि परवा देखील सुट्टी. तिची कालपासूनच इतकी आठवण येते आहे ना. कधी संपणार ही सुट्टी. ती दिवस रात्र फक्त माझ्याच सोबत असावी अशी खूप इच्छा होते. रोज रात्री मी जेवायला जातांना, म्हणजे सगळीकडेच प्रत्येक मुलीत तीच वाटते.

काल बस फुल झालेली. शेवटून दुसऱ्या सीटवर जागा मिळाली. माझ्या पुढच्या मुलींची एक चप्पल माझ्या पायाजवळ. त्या माझ्या बाजूच्या काकूंना चप्पल तुमची आहे का अस विचारलं. झाल्याच की सुरु काकू. मग चिंचवड येईस्तोवर काकुंचे लटके झटके. बापरे! उठून पळून जाव अस वाटायला लागलेलं. रोज मी घरी आरशात स्वतःला पहात असतो. माझ्यात काही आहे का, की जे तिला आवडेल. ती देखील माझ्या प्रेमात पडेल. पण काहीच नाही सापडत. न माझा चेहरा ना तब्येत आणि ना रंग. आणि ना बोलायची हिम्मत. आणि बोललो तरी अगदी मोजकेच.

सोडा, मला माहित आहे. मी रोज खूप खूप बोर करतो सगळ्यांना. रोज याच विषयावर बोलून. परवा माझा मित्र देखील मला हेच सांगत होता. नोंदीमध्ये तोच तोच पणा आलेला आहे. पण खरंच तिला पहिल्या पासून ‘नशा’ चढल्यानंतर जसे होते ना, तस् होत आहे अगदी. सगळीकडे अप्सराच. फक्त अप्सराच दिसते. स्वप्नात देखील तीच आणि विचारातही तीच. मला दुसरे कुठले व्यसन नाही. पण बहुतेक मी आता झालेलो आहे व्यसनी. आणि त्याचीच ही नशा. आज वडील घरी ये म्हटले होते. पण नाही गेलो. नाही काही सुचत. यार, आताही बोर केल ना मी! कदाचित ही नशा जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत असेच चालणार.. सॉरी सॉरी मला फक्त अप्सरा हवी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.