फक्त मराठीच


बऱ्याच दिवसांनी अचानक प्रकट होतो आहे. मोठ्या मनाने क्षमा कराल अशी अपेक्षा करतो. अनेक दिवसांपासून मनात एक विचार घोळतो आहे. भाजप-शिवसेनेचे लफडे पाहून पार विटून गेलेलो. अस वाटलेलं नेमक कोण मूर्ख. आपण की ते? असो, गेले काही महिन्यांपासून निरीक्षण करतो आहे. जेव्हापासून ‘मोदी लिपीत’ देशाचे व्यवहार सुरु झालेत. तेव्हापासून हे गुज्जूभाई. अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत स्पष्ट मराठीत व्यवहार करायचे. आता काय करणार. दुधावाल्यापासून ते किराणा. इस्त्रीपासून ते मिठाईवाल्यांपर्यंत हेच भय्या. फक्त केस कापणारा देवकृपेने मराठी. आजकाल हे सगळे अचानक ‘हिंदीत’ सुरु झालेत. गझनी चित्रपटातील गझनीने ह्यांची ‘मेमरी’ लॉस केली काय, देव जाणे.

महिना-दोन महिने यांचे नाटक पहात होतो. असो, कधी ना कधी सटकणार तर होतीच. काल, झापलं मग ‘गुज्जूंना’. या निगडी चौकात एक ‘प्रदीप स्वीट’ नावच दुकान आहे. तिथे गेलेलो. काय तोंडातल्या तोंडात, गुजरातीच्या टोनिंग मध्ये हिंदी बोलल्यावर त्याच्या ‘पप्पांना’ तरी समजणार का?? अगदी सौजन्याने त्याला मराठीत बोल असे म्हणालो. तर मला, ‘मराठी नही आता’ असे आवाज चढवून बोलला. मग काय?? झापला. त्याला म्हटलं, तुझ्या दुकानातून नेहमी वस्तू खरेदी करतो. तुझा धंदा वाढवतो आहे. आणि वर तू मला येत नाही बोलतो. इथे राहतो. इथे खातो. इथे तुझा व्यवसाय करतो. आणि मराठी येत नाही अस म्हणतो. नसेल येत तर शिक.

त्याला म्हटलं नशीब समज तू इथे कशाला आलास, अस विचारात नाही. हिंदी मलाही येत नाही. आणि मी बोलणार तर बिलकुल नाही. मग काय, साहेब घडाघडा ‘मराठीत’ सुरु झाले. हे पाहून आजूबाजूचे लोकही हसू लागले. खरच, खूप शीण आलाय. बघाल तो ‘हिंदीतच’ सुरु होतो. बर, एखाद-दोन दिवस ठीक आहे. पण आता ह्यांनी रोजचंच सुरु केलाय. असो, माझाही अस आता रोज मराठीत सुरु राहील. कस ह्या भय्यांना ‘वठणीवर’ ते बघाच. दुकानातील बाजूला उभे असणारे काका देखील, ‘ह्यांना आपण फार लाडावून ठेवलय’ अस म्हणून त्याला सोबत आहोत याची जाणीव करून दिली.

असो, फार पकवत नाही. हे फालतू राजकारण पाहून मन फारच विटून गेलाय. पण मराठी प्रेम अजून संपलेलं नाही. गरज पडल्यावर, हाताची भाषा वापरायला मागे-पुढे पाहणार नाही. बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.