बाय


कालचा तो सोमवार. कसला होता. शनिवार आणि रविवार तिची इतकी आठवण यायची. आणि सोमवारी घडल भलतंच! अप्सरा कंपनीत आली आणि माझ्याकडे बघेच ना! दुपारपर्यंत असंच. इतक बोर झालं ना. वाटल जीवनाला काही अर्थच नाही. फ़क़्त गंगा यमुना यायच्या बाकी राहिल्या होत्या. पण जातांना मी तिला हिम्मत करून ‘बाय’ म्हटलं. किती छान ‘बाय’ करते ती! ‘हाय’ पेक्षाही ‘बाय’ बघून हार्टटॅक आल्यात जमा होता. पण ना माझी त्याच्यापुढे काही बोलण्याची हिम्मतच होत नाही.

आजही असंच, आज सकाळी ती माझ्या एक खुर्ची सोडून बाजूला नाश्ताला बसली होती. पण नेहमीप्रमाणे पुन्हा साधी ‘हाय’ किंवा बघण्याचीही हिम्मत झाली नाही. ती तिच्या ग्रुप सोबत बसली होती. आज तर ती इतकी छान दिसत आहे ना! अरे हो, काल तिच्या ड्रेसचा आणि माझ्या ड्रेसचा रंग एकच! काल खरच ‘बाय’ च्या आधीचा वेळ खूपच भयानक होता. अस वाटत होते. ती आपल्याला मिळेल की नाही. अगदी मला मी जगातील सगळ्यात भंगार मुलगा वाटत होतो. खर तर आत्ताही तेच वाटते आहे. तिच्याशी बोललो नाही किंवा तिने मला पहिले नाही की खूप दिवस उदास होतो. वेडा झालो की काय याची शंका येते. नेहमी तिची आठवण येत रहाते. आणि ती समोर आली की साधी तिला बघण्याचीही हिम्मत होत नाही. मुळात ती सोडून कशात रसच वाटत नाही.

काल रात्री माझी मैत्रीण माझ्याशी फोनवर बोलत होती. पण मला साध फोनवर सुद्धा बोलायची इच्छा होत नव्हती. सगळीकडे फ़क़्त तीच वाटते. तिला कधी वाटणार माझ्यात रस, कुणास ठाऊक! ती सोडून सगळ निरर्थक वाटत. खूप जास्त गुंतत चाललो आहे मी तिच्यात. आजकाल तीच स्वर्गीय आनंदाचे आणि दुःखाचे कारण बनली आहे. अस वाटत रहात की, ती फ़क़्त माझ्यासाठी आहे. पण कंपनीत आलो की वास्तवाची जाणीव होते. आधी मी ज्या मुलींकडे बघायचो. त्या आजकाल माझ्याकडे मी ज्या नजरेने बघायचो त्याच नजरेने त्या माझ्याकडे बघतात. पण त्यांच्याकडे बघण्याची इच्छाच होत नाही. काल माझी मैत्रीण माझ्याशी काय बोलत होती, पण काय बोलते याकडे माझे लक्षच नव्हते. कालही टेन्शन मध्ये कामाचा मेल चुकीचा पाठवला होता. आज सकाळी लक्षात आले. ती सोडून दुसरे काही सुचतच नाही. तिला जे मित्र आहेत ते माझ्यापेक्षा दिसायला आणि वागायला खूप पटीने चांगले आहेत. त्यांना पाहून ती माझा का विचार करेल अस सारखे विचार मनात येतात. पण तिने साधे नुसते बघितले की पावसाला सुरवात झाल्याप्रमाणे वाटते. आणि नाहीतर कडक उन्हात फिरल्यासारखे. आजही ‘हाय’ करायची खूप इच्छा होत आहे. ‘हाय’ सोडा, खूप गप्पा मारायची इच्छा होत आहे. पण पुन्हा हिम्मतच नाही होत आहे. ती कधी माझ्याप्रमाणे.. माझ्यात गुंतणार?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.