बुट्टी


बुट्टी! काय चालल आहे यार! काय बोलाव अस झाल आहे. मोजून दहा दिवस हातात उरले आहेत. आणि त्यात हे माझे वागणे. शपथ, मी. काय ठरवतो आणि काय होते. आठवडाभर तिच्या आठवणीने इतके सतावले ना! आणि काल ऑफिसला बुट्टी झाली माझी. परवा रात्री झोपच येत नव्हती. बर कसाबसा वेळ घालवायची काम केली. पण तरीही, चारच्या सुमारास झोप आली. आणि सकाळी उठून पाहतो तर सकाळचे साडे दहा. मग पुन्हा जाग आली तर, झटपट आवरलं. वेळ पहिली तर दुपारचा एक. मग काय कंपनीला बुट्टी झाली.

वाटल होते, तसेच जावे. पण नाही, बस पकडून जायला. म्हणजे घरातून निघून बस मिळेपर्यंत बराच वेळ गेला असता. म्हणून मग नाही गेलो कंपनीत. त्यात हे फोन. एकामागून एक आपले चालूच. हे झाल की ते! जाम वैताग आला. यार तिला माझी आठवण आली असेल का? तिच्या वाढदिवसाला मी, स्वत: डिझाईन केलेला इमेल पाठवलेला. काय माहीत तिला तो इमेल आवडला असेल की नाही. एक काळपट लाल रंगाचे बॅकग्राउंड. त्यात एक पांढऱ्या गोल. त्यात गोलच्या बाजूला सुर्याला जसे किरणे असतात ना, तस् पण हलकेसे. त्या गोलाच्या बाजूला रंगीबेरंगी फुगे. आणि गोलाच्या खालच्या बाजूला थोडी नक्षी आणि थोडा पिवळसर रंगाचे, भेट वस्तूंचे बॉक्स. त्या पांढऱ्या रंगाच्या बॉक्समध्ये तिचा वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यात एक ओळ आहे. सोडा फार गोंधळून टाकत नाही. म्हणजे ते वाक्य बाकी नेटवरून ढापले.

पण त्यात एका ओळीत ‘तुझ्या वाढदिवसाला तुझी जे आठवण काढतात त्यात, मी ही एक आहे’. वाटलं होते, ते वाक्य गाळावे. पण ठेवले. त्यावेळी तेच योग्य वाटले. एकूणच तसा इमेल ठीकठाक आहे. पण तिला आवडला तर मिळवलं. याआधी पर्यंत इमेल डिझाईन केलेले, पण ते कंपनीसाठी. आयुष्यात पहिल्यांदा कोणासाठी तरी, कोणासाठी काय माझ्या सर्वात आवडत्या, खूप छान, आणि खूप खूप सुंदर एका अप्सरेच्या वाढदिवसासाठी! पण यार एक चूक झाली. त्यात मी तिचे नाव टाकायचे राहूनच गेले. जाऊ द्या आता बोलू काय उपयोग? काल तिला मी माझी हार्ड डिस्क देणार होतो. पण बुट्टी झाल्याने सगळंच राहिले. गेले चार दिवसांपासून त्या हार्ड डिस्कमधील फाईल्सची नीट नेटकी सेटिंग करतो आहे. एका मित्राला दिलेली. त्या हिरोने व्हायरस भेट दिले. दिले कसले त्याच्या संगणकात त्या ही वेळेस होते. शेवटी त्याच्या संगणक फॉर्मट केला. नंतर खूप रात्र झालेली. म्हणून हार्ड डिस्क तशीच आणली.

तस् याआधी कोणालाच मी माझी हार्ड डिस्क देत नव्हतो. पण तो खुपच जवळचा. त्यानंतर माझा संगणकच बंद. त्यामुळे ती स्कॅन करणे आवश्यक होते. म्हणून दुसऱ्या मित्राकडे गेलो. तर त्याच्याही संगणकात व्हायरस महाशय. पुन्हा सगळ तेच. बहिणाबाईचा हा नन्हा मुन्ना ‘लॅपटॉप’ आणला. आता तिचे ‘हे’ गेलेत परदेशी दौऱ्यावर. मग आता मागितला.. आज रात्री जाऊन देईल. ह्या बहिणाबाईच्या नन्हा मुन्ना मध्ये, नन्हा मुन्ना यासाठी की, मोजून दहा इंच ची स्क्रीन आहे. जीनच्या खिशातही मावेल एवढासा आहे. ह्या संगणकातही व्हायरस होता. असो, माझी हार्ड डिस्क आता तीनदा तीन तीन वेगळ्या एंटीव्हायरसने स्कॅन केलेली आहे.

असो, हा आठवडा खुपच बेकार गेलाय. जास्त पकवत नाही. तिला भेटायची खूप ओढ लागली आहे. कशी असेल ती? तिच्या वाढदिवसाला मी तिला काहीच गिफ्ट दिले नाही. आता गिफ्ट द्यायची खूप इच्छा आहे. पण तिला ते ऑड वाटेल. त्या वानर सेनेने काय दिले का ते पाहतो. नाहीतर मी तिला देऊनच टाकू का? पण काय देऊ?

सोडा, मनातलं सांगून टाकू? की, नाही नको. ती मी तिला हार्ड डिस्क देतो आहे याचा अर्थ त्याच्यासाठीच सगळी नाटक करतो आहे अस होईल. एकतर माझ हे भाग्य आहे की, ती मला भेटली. माझ्याशी बोलली. खरच भाग्य असाव लागते. बस दहा दिवस! नंतर तेच सगळे. नको तो ‘नंतर’चा विषय. कदाचित तिला मी मनातलं सांगितल्यावर ती भडकेल. कदाचित काहीच बोलणार नाही. कदाचित उदास होईल. काय करू? सांगायला हव ना? का नको सांगू. यार ही बुट्टीने खूप वेळ विचार करून डोक् गोंधळून गेल आहे. ही बुट्टी झाली नसती तर..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.