बोरकर


खरंच खूप आनंद होत आहे. काय सांगू, आज मी तिला इतक बोर केल की, तिने मला शेवटी मी बिझी आहे. अस म्हटलं. खरंच मी खूप बोर करणारा आहे. कोण कामात आहे आहे, कोण मोकळ आहे हे सुद्धा कळत नाही मला. तिच्या प्रोजेक्टमध्ये खूप काम आहे. आणि मी सारखा पिंग करून तिला त्रास देतो. सर्वांनाच मी खूप बोर करतो. फोनवर बहिणाबाईला, घरी आई वडिलांना. आणि कंपनीत तिला. काय बोलावं, तेच कळत नाही आहे.

ब्लॉगवर देखील बोर करतो. मुळात मी खर्या अर्थाने ‘बोरकर’ आहे. संगणकाच्या कोर्स करीत असतांना देखील मला सर्व शिक्षक आणि शिक्षिका वैतागून जायच्या. मित्र तर तोंडावर बोर नको करू म्हणून बोलतात. इतक्यांदा सांगून देखील मला कळत नाही. स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे असे वडील नेहमी म्हणतात. पण माझ कुठेच कंट्रोल नाही. ना बोलण्यात आणि ना वागण्यात. बर, समोरचा कामात आहे, की दुखी की आनंदी हे देखील पाहण्याची अक्कल मला नाही. आणि आताही तेच करतो आहे. तुम्हाला बोर! असो, मी आता कोणालाच बोर नाही करायचे ठरवले आहे. आतापासून नाही पकवणार. बस आता बंद करतो माझी पकपक.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.